दोन्ही काँग्रेसची प्रदेशाध्यक्षपदे साताऱ्यात!

तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्याकडे तोकडी मंत्रीपदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर संधी देवूनही इच्छुकांचे समाधान करण्याचा मार्ग नेतृत्वासमोर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी इतरांच्या हाताखाली आता मंत्री होवू नये, असे अनेकांचे मत आहे. तर शशिकांत शिंदे निवडून आले असते तर हमखास मंत्री झाले असते. मात्र आता प्रदेशाध्यक्ष देवून त्यांचा मानसन्मान राखला जाणार आहे.
Territorial posts of both Congressmen in Satara!
Territorial posts of both Congressmen in Satara!

पुणे: राज्याचे नेतृत्व करणारा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्हयात यावेळी सत्तेतील दोन प्रमुख पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद शशिकांत शिंदे यांना मिळू शकते.

पृथ्वीराज चव्हाण यांचा कऱ्हाडचे खासदार ते कऱ्हाडचे आमदार असा प्रवास झाला आहे. 2010 ते 2014 याकाळात राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले. आता ते कऱ्हाड दभिणमधून आमदार आहेत. त्यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असलीतरी त्यांनी संघटनेचे काम सोपवले जाण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मंत्रीमंडळात असतील. त्यामुळे सद्यातरी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय दुसरे सक्षम नाव काँग्रेसकडे नाही. 

माथाडी नेते असलेले शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आमदार होते. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. 1999, 2004 ला ते जावलीतून आमदार झाले. 2009, 2014 मध्य़े ते कोरेगाव मतदारसंघातून निवडून गेले. मात्र आता अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवारनिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेवून प्रदेशाध्यक्ष बनवले जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com