नेवाशाच्या मशिदीत सापडले दहा विदेशी नागरिक, गुन्हा दाखल 

जामखेडमधील मशिदीत विदेशी नागरिक सापडले होते. यातील दोन विदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ही घटना काही दिवस होता आहेत नाहीत तोच नेवाशाच्या मशिदीत 10 विदेशी नागरिक काल रात्री आढळून आले
Ten Found in Nevase Masjid
Ten Found in Nevase Masjid

नगर  : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता नगर शहरात व जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवला जात आहे. विदेशी नागरिक विदेशातून आलेले नागरिक यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जामखेडमधील मशिदीत विदेशी नागरिक सापडले होते. यातील दोन विदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ही घटना काही दिवस होता आहेत नाहीत तोच नेवाशाच्या मशिदीत 10 विदेशी नागरिक काल रात्री आढळून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमाव बंदी व संचारबंदी लावून केली आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षाही जास्त नागरिक रस्त्यावर आढळून येत नाहीत. कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत नाही ना याची पडताळणी पोलिस प्रशासन करीत आहे. त्यासाठी शहरात व गावात विविध ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू आहे. अशीच नेवाशात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एका मशिदीत विदेशी नागरिक थांबलेले आहेत. 

याबाबत पोलिस प्रशासनाला अथवा जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक नेवाशातील भालदार (मरकस) मशिदीत गेले. या मशिदीत 10 विदेशी नागरिक आढळून आले. यात जिबुती येथील पाच, बेनिन येथील एक, डेकॉर्ट येथील तीन, घाना येथील एक विदेशी नागरिक आढळून आले.

या संदर्भात नेवासे येथील पोलिस कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी भालदार मशिद ट्रस्टचे पठाण जुम्माखान नवाबखान व सलीम बाबुलाल पठाण यांच्याविरोधात नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दहा विदेशी नागरिकांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com