पारनेरचे दहा नगरसेवक सहलीला : आमदार विजय आैटींना धक्का

पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत आमदार विजय औटी यांना धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बंड करीत शिवसेनेचे काही नगरसेवक विरोधी गोटात सामिल झाले आहेत. सतरा पैकी दहा नगरसेवक सहलीला गेले आहेत.
पारनेरचे दहा नगरसेवक सहलीला : आमदार विजय आैटींना धक्का

पारनेर (जि. नगर) : पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत आमदार विजय औटी यांना धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बंड करीत शिवसेनेचे काही नगरसेवक विरोधी गोटात सामिल झाले आहेत. सतरा पैकी दहा नगरसेवक सहलीला गेले आहेत.

नगरपंचायतीमध्ये बसत असलेला धक्का आगामी काळात विधानसभेला धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते. नगरपंचायत निवडणूकीत आमदार औटी यांच्याकडे 12 नगरसेवक होते. विरोधात पाच होते. मात्र, अडीच वर्षानंतर आमदार औटी यांनी काही नगरसेवकांना दिलेले शब्द न पाळल्यामुळे या नगरसेवकांनी औटी यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. या बंडखोरीत सेनेचे पाच नगरसेवक सामील असल्याचे बोलले जात आहे. या बंडखोरी मुळे 23 तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षा निवडीत काय चमत्कार होणार, याकडे तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com