telephonic conversation between deputy chief minister ajit pawar and sanjay pawar | Sarkarnama

कोण देत नाही द्या बर फोन, बघतो मीपण; अडचणीचा दादा स्टाईल निपटारा!

संपत मोरे
गुरुवार, 26 मार्च 2020

उपमुख्यमंत्री अजितदादांनी अशाप्रकारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतीच्या कामाला लागणारे डिझेल पेट्रोल द्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

पुणे: "कोण तुम्हाला डिझेल देत नाही. द्या बघू फोन. मी शेतकऱ्यांच्या कामाला डिझेल पेट्रोल द्या, असे आदेश कलेक्टरांना दिले आहेत," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवासेनेचे शिरूर तालुका प्रमुख संजय पवार यांना फोनवरून सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री पवार आणि संजय पवार यांच्यातील मोबाईल संवाद  व्हायरल झाला आहे. संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात हा फोन केला होता. प्रत्युत्तरादाखल अजितदादांनी प्रश्न सोडविण्यासंदर्भात जी तत्परता दाखवली, त्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

अजितदादा व संजय पवार यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे:

संजय पवार: दादा, संजय पवार बोलतोय. युवा सेना शिरूर तालुका प्रमुख.

अजितदादा: बोला.
संजय पवार: दादा, प्रॉब्लेम काय झालाय. काल थोडा अवकाळी पाऊस झाला ना आणि आता सगळ्यांचे गहू काढायला आलेत आणि गव्हाच्या हार्वेस्टिंगला पेट्रोल पंप वाले डिझेल देईनात."

अजितदादा : अहो मी आता पुण्याच्या एस पी कलेक्टर यांना सांगितलेले आहे. मशिनला डिझेल पेट्रोल द्यायला. शेतकऱ्यांच्या कामाला डिझेल पेट्रोल द्यायला सांगितले आहे.  
संजय पवार : ओ के दादा चालेल. 
अजितदादा: कोण देत नाही. द्या बर फोन. 
संजय पवार: नाही आता आम्ही हिकडं आलोय. पंपावर पोलीस बंदोबस्त आहे. 
अजितदादा: अहो, द्या ना कोण देत नाही. बघतो मीपण. 
संजय पवार : तिथं गेलं की मी फोन करतो तुम्हाला दादा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख