मीरा बोरवणकर यांच्यानंतर तेजस्वी सातपुते साताऱ्याच्या दुसऱ्या महिला SP

मीरा बोरवणकर यांच्यानंतर तेजस्वी सातपुते साताऱ्याच्या दुसऱ्या महिला SP

सातारा :  जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुणे शहरच्या पोलिस उपायुक्त  तेजस्वी सातपुते यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा बोरवणकर यांच्या नंतर दुसऱ्यांदा जिल्ह्याला महिला अधिकारी नियुक्ती झाली आहे. मीरा बोरवणकर यांच्यानंतर  पोलिस अधीक्षकपदी श्रीमती तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे. 

पुणे शहर  उपायुक्त म्हणून काम करताना सातपुते यांनी पुणे शहरात हेल्मेटसक्ती मोहीम प्रभावीपणे राबविली. तसेच भीमा कोरेगाव व चाकण येथील दंगल प्रकरण त्यांनी यशस्वीपणे हाताळले होते.  काम करताना लोकांचे प्रश्न काय आहेत, याची माहीत घेऊनच त्यावर निर्णय घेतात.

सातपुते 2011 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यानी परतूर येथे सहाय्यक पोलीस  अधिक्षक, सी आय डी तांत्रिक सेवा विभागाचे अधीक्षक, पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदावर काम केले आहे.

राज्यातील प्रमुख उपायुक्त, उपमहारीक्षक आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत.

उपमहानिरीक्षक पदाच्या बदल्यांमध्ये मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे दत्ता कराळे यांची ठाणे शहर अतिरिक्त आयुक्त पदी, ठाणेचे अतिरिक्त आयुक्त पी. आर. दिघावकर यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले जयंत नाईकनवरे यांची मुंबईत दहशतवाद विरोधी पथकात उपमहानिरीक्षक पदी बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची विक्रीकर विभागात महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

अधीक्षक व उपायुक्त पदाच्या बदल्यात नाशिक लाचलुचपत विभागाचे अधीक्षक पी. व्ही. उगळे यांची जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची गोंदियाला बदली झाली आहे. तर गोंदियाचे हरीष बैजल यांची धुळ्याला राज्य राखीव दलाच्या अधीक्षक पदी बदली झाली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांची वीज वितरण सुरक्षा व अंमलबजावणी विभागात बदली झाली आहे. महाराष्ट्र सदनचे निवासी उपायुक्त इशू सिंधू यांची नगरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांची नागपूरला गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे.

वीज वितरणाच्या सुरक्षा अंमलबजावणी विभागाचे अरविद साळवे यांची भंडारा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. अमरावतीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयंत मिना यांची बारामतीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. नाशिक गुप्तवार्ताचे सुनील कडासने यांची  नाशिकला लाचलुचपत विभागात अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त अधीक्षक संदीप पखले यांची बीडला तर  वैभव कलुबरमे यांची चंद्रपूरला बदली झाली आहे. चंद्रपूरचे हेमराज राजपूत यांची बुलढाण्याला, बुलढण्याचे श्याम घुगे यांची अमरावती ग्रामीणला, तर राज्य राखीव दलाचे सचिन गोरे यांची जळगाव चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. चाळीसगावचे प्रशांत बच्छाव यांची धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com