Tejas Thakare wantes to see campaign so .... | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

'तेजसला दौरा बघायचा होता म्हणून...!'

मिलिंद तांबे   
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

तेजसला वन्यजीवांच्या संशोधनात रस आहे राजकारणात नाही.

-आदित्य ठाकरे

मुंबई :  'तेजसला दौरा बघायचा होता म्हणून उद्धव साहेबांसोबत गेला होता, उद्या कदाचित तो माझ्यासोबत ही येईल' असं सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला भाऊ तेजस ठाकरे हे राजकारणाच्या वाटेवर असल्याच्या वावड्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

तेजसला वन्यजीवांच्या संशोधनात रस आहे राजकारणात नाही असंही ते पुढे म्हणाले.

भायखळ्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर आणि मुंबदेवीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुनीला पाटील आणि माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी आज मातोश्रीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मला वरळीचा विकास करायचा आहे.केवळ वरळीच नाही तर मला संपूर्ण महाराष्ट्राच नव्याने घडवायचा आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी नवा महाराष्ट्र घडवू शकतील ती सर्व लोक आमच्याकडे आहेत अस सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. 

वरळीतील मतदारांसाठी आपण 'हार्ट टू हार्ट' असं पत्र लिहिलं आहे,वरळी मतदारसंघातील उमेदवार म्हणून आपण हे पत्र लिहून वरळीच्या विकासाबद्दलच्या माझ्या कल्पना आपण मतदारांपर्यंत पोहोचवल्या असल्याचं ही ते पुढे म्हणाले.

मी माझ्या विरोधातील उमेदवारांवर बोलत नाही,कारण त्यांना काय बोलायचं आहे हा त्यांचा अधिकार आहे, असं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे टाळले.

समान नागरी कायद्या संदर्भात 'सामना' आणि सभेत जे सांगितलं तीच आमची भूमिका आहे.निवडणूक म्हटलं की काही गोष्टी घडतात, निवडणुकीत काही दुखावतात काही सुखवतात पण हे चालाचचं अस सांगत त्यांनी बंडखोरांवर अधिक बोलण्यास नकार दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख