tejas express and mahrashtra | Sarkarnama

अहमदाबाद-मुंबई दरम्यान आज धावणार पहिली खासगी तेजस एक्‍स्प्रेस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील पहिली खासगी तेजस एक्‍स्प्रेस शुक्रवारी (ता. 17) अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धावेल. अहमदाबाद येथे रेल्वेमंत्री पियूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने चालवली जाणारी ही दुसरी खासगी एक्‍स्प्रेस आहे. 

दिल्ली-लखनऊ स्थानकांदरम्यान 4 ऑक्‍टोबर 2019 रोजी देशातील पहिली खासगी तेजस एक्‍स्प्रेस सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेचे अनेक विभाग खासगी तत्त्वावर चालवण्यात येत आहेत. एकूण 150 खासगी एक्‍स्प्रेस 100 मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. या खासगी एक्‍स्प्रेसमधील सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करणार आहेत. प्रवाशांसाठी तिकिटाचे दर लवचिक असतील, असे सांगण्यात आले. 

गुजराती वेशभूषेत " रेल्वे सुंदरी' 
खासगी तेजस एक्‍स्प्रेसमध्ये "रेल्वे सुंदरी' आणि रेल्वे कर्मचारी गुजराती वेशभूषेत दिसणार आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनरनी ही वेशभूषा तयार केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना पिवळ्या रंगाचा सलवार-कुर्ता आणि पांरपरिक टोपी असा वेश देण्यात आला आहे. पुरुष कर्मचारी पिवळा शर्ट, काळी पॅंट आणि पारंपरिक टोपी अशा पेहरावात दिसतील. दिल्ली-लखनऊ मार्गावरील पहिल्या तेजस एक्‍स्प्रेसमधील "रेल्वे सुंदरी' पाश्‍चिमात्य वेशभूषेत दिसतात. 

महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळी 
तेजस एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळी मिळणार आहे. गुजराती थाळीत डाळ, कढी, बटाटा भाजी, शेव-गाठिया टोमॅटो भाजी, फाफडा, जिलेबी आदी पदार्थ असतील. कोंबडीचा रस्सा, कोकणी चिकन, चिकन कोल्हापुरी, हिरवा मटार-बटाटा भाजी, बटाटा वडा, बाकरवडी, कोथिंबीर वडी, श्रीखंड, कांदे पोहे या मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद प्रवाशांना घेता येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख