Teachers using social media for increasing admissions | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

शाळा प्रवेशासाठी आता सोशल मीडियाचा वापर

खंडु मोरे  सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

सोशल मीडियावर माहिती दिल्याने पटसंख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल. जिल्हाभर त्या लोकप्रिय ठरत आहेत.

 --शोभा पारधी गटशिक्षण अधिकारी ,देवळा 

नाशिक: खडू-फळा, शेणाने सारवलेले वर्ग अन् सतरंज्या हे जिल्हा परिषद शाळांचे चित्र हद्दपार झाले आहे. यादृष्टीने सगळ्यांच्या पुढे जात देवळा (जि. नाशिक) येथील काही शिक्षकांनी चकचकीत शाळांचे फोटो, व्हीडीओ अऩ् प्रवेशाचे आवाहन करणारे ऑडिओ  सोशल मिडीयावर अपलोड केले  आहेत . ग्रामीण भागात शाळा प्रवेशासाठी सोशल मिडीयाचा हा वापर चर्चेचा विषय ठरला आहे. 

सध्या सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम झाले आहे. त्या माध्यमाचा उपयोग सध्या सर्वच क्षेत्रात होतो आहे. सर्वांच्या हातात मोबाईल व इंटरनेट थिरकू लागल्याने येथील कल्पक शिक्षकांनी हा मार्ग चोखाळला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या प्रवेशाच्या जाहिराती सोशल मीडियावर झळकत आहेत. पाटी पुस्तक आणि पेन्सिलच्या पुढे जात जिल्हा परिषदेच्या शाळांनी व शिक्षकांनी शाळा प्रवेशासाठी वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची फोटो,ऑडिओ व व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड केले. अनेक गावांमध्ये फलकही लावले आहेत.

मराठी शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा यासाठी अनेक शाळांनी शाळेत राबवत असलेले उपक्रम, शाळेचे वैशिष्ठे, शाळेची स्थापना, ब्रीदवाक्य, माजी विद्यार्थ्यांची माहिती, दुरध्वनी, इमेल, वर्षभरातील उपक्रम यु ट्यूब वरही दिलेत. विध्यार्थ्यांना काय काय मिळते याची अस्तीशय कल्पकतेने अनोख्या पद्धतीने जाहिरात कौतुकाचा विषय आहे.

जिल्हा परिषद शाळांची संख्या रोडावल्याची सतत चर्चा होते. मात्र सोशल मीडियावरील जाहिराती पालकांचा हा दृष्टिकोन बदलु शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच या शाळांची पटसंख्या गेल्या दोन वर्ष्यात वाढली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख