शिक्षकांची अशैक्षणिक कामे होणार बंद; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्‍वासन

शिक्षकांना शिकवणे सोडून करावी लागणारीकामे आता आम्ही टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. यामुळे राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे
Additional Works of Teachers Will Be Stopped Assures Varsha Gaikwad
Additional Works of Teachers Will Be Stopped Assures Varsha Gaikwad

मुंबई : जहाजांच्या कप्तान कडून आम्ही गुणवत्तेची अपेक्षा करतो. परंतु, त्यांना 250 अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात येते. या कामांमध्ये केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे. मुळात शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ही कामे आता आम्ही टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. यामुळे राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने रविवारी (ता.19) सायन येथे मुख्याध्यापक भवनात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. शिक्षणमंत्री होऊन मला 15 दिवस झाले आहेत. पण मी स्वत: शिक्षिका असल्याने मला शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न माहिती आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

''आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना 250 अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ते आम्ही आता टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत. त्याबरोबर मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू असून तो प्रश्न ही लवकरच मार्गी लावू,'' असे त्या म्हणाल्या. 

शिक्षकांनी त्यांचे प्रश्न इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चर्चेने सोडवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, दिलशाद थोबानी, सचिव प्रशांत रेडीज यांच्या हस्ते खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक भास्करराव बाबर व महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. 

मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते मुंबई विभागातील प्रत्येक वॉर्डमधील एक गुणवंत मुख्याध्यापक अशा 17 उत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, सेवानिवृत्त सदस्य, माजी अध्यक्ष, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व इतर बिगर राजकीय संस्थाचालक, शिक्षक संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com