मतदानाची शाई दाखवा ; गुळाचा चहा मोफत प्या

tea_culture
tea_culture

माधवनगर  : 'कुणाला पण करा, पण मतदान करा' असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणा घसा फोडून करीत आहे. दुसऱ्या बाजुला समाजातील विविध घटकही बांधिलकी जपत आहेत.

वाळवा तालूक्‍यातील पडवळवाडीचे सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी सचिन येवले यांनी मतदान केलेल्या मतदारांना मोफत चहा देणार आहे, अशी घोषणा केली आहे.

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर पडवळवाडीनजीक येवले यांचा चहाचा स्टॉल आहे. सेंद्रीय गुळाच्या आयुर्वेदिक चहासाठी तो प्रसिद्ध आहे. 21 ऑक्‍टोबरला विधानसभेसाठी मतदान आहे.

प्रत्येक मतदाराने मतदानाची जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडली पाहिजे, असे सांगून जे मतदान करतील आणि बोटावरची शाई दाखवतील यांना हा मोफत आयुर्वेदिक चहा दिला जाणार आहे, अशी माहिती येवलेंनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com