tanaji who changes office face | Sarkarnama

या `तानाजी`चे नाव ठाण्यात ज्याच्या त्याच्या तोंडी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे : जनतेची गर्दी असलेले कोणतेही सरकारी कार्यालय नजरेसमोर आणा. कागदांचे ढिग, आजुबाजुला धूळ, अस्ताव्यस्त टेबलखुर्च्या, पान थुंकून लालेलाल केलेला जिना आणि तितकेच मख्ख कर्मचारी. पण चुकून एखाद्या कार्यालयात नागरिकाला पंचतारांकित हाॅटेलसारखा फिल आला तर....तर तो ठाण्यातील मुद्रांक व नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने दिला आहे.

पुणे : जनतेची गर्दी असलेले कोणतेही सरकारी कार्यालय नजरेसमोर आणा. कागदांचे ढिग, आजुबाजुला धूळ, अस्ताव्यस्त टेबलखुर्च्या, पान थुंकून लालेलाल केलेला जिना आणि तितकेच मख्ख कर्मचारी. पण चुकून एखाद्या कार्यालयात नागरिकाला पंचतारांकित हाॅटेलसारखा फिल आला तर....तर तो ठाण्यातील मुद्रांक व नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने दिला आहे.

ठाणे शहरात खरेदी-विक्री दस्त नोंदणीची संख्या मोठी आहे. पण कार्यालय मात्र जुन्या पद्धतीचे होते. तेथे दुय्यम निबंधक म्हणून बदलून गेलेल्या तानाजी गंगावणे यांनी या कार्यालयाचा कायापालट केला. तेथे गेलेला प्रत्येक नागरिक हरखूनच केला. तत्पर सेवेसह तेथे सोयीही वाढवल्या. ठाण्यातील फ्लॅटच्या किमती कोट्यवधी रुपयांवर गेल्या आहेत. पण कार्यालय मात्र जुनाट पद्धतीचे होते.

लोकांना तेथील बदल इतका आवडला की जो तो या कार्यालयाचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपू लागला. कोणी फेसबुकवर त्याचे चित्रण करत लाइव्ह फिल इतरांना दिला. मनसे नेते आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांनाही राहवले नाही आणि त्यांनीही गंगावणे यांची मुलाखत रेकाॅर्ड करत ती फेसबुकवर शेअर केली. एका तानाजीने शिवरायाच्या स्वराज्यासाठी प्राण दिला आणि या तानाजीने जनतेसाठी काम केले, अशा शब्दांत पानसे यांनी त्यांचे कौतुक केले.

गंगावणे हे पुणे जिल्ह्यातील खेडचे. पुणे येथील मुद्रांक विभागाच्या मुख्यालयात काम केल्यानंतर त्यांनी माणगाव (जि. रायगड) येथे दुय्यम निबंधक म्हणून काम केले. त्यानंतर ते २०१६ मध्ये ठाण्यात रुजू झाले. येथील कार्यालयाची स्वच्छता करून तेथील रद्दी हलविली. अभ्यागत कक्ष एकदम चकाचक केला. कामाचा वेग वाढवला. तत्पर सेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे नागरिकांचा या कार्यालयाकडे पाहण्याच दृष्टीकोन बदलला.

गंगावणे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या कार्यालयात कलादालन सुरू केले. परिसरातील चित्रकारांची चित्रे येथे लावण्यात आली. त्यांच्या विक्रीचीही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरासाठी किंवा भेट देण्यासाठी चित्रे सहज मिळू लगली आहेत. स्थानिक कलाकारांना त्यामुळे व्यासपीठ मिळाले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक अनेक जण करत आहेत. पानसे यांच्याच शब्दांत सांगायचे तर ते या कार्यालयात दरवर्षी येत होते. पण सरकारी अधिकारी इतका चांगला काम करतो, याच्यावर विश्वास गंगावणे यांच्यामुळे विश्वास बसला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख