तानाजी सावंतांच्या जागेवर 10 महिन्यांसाठी कोण आमदार होणार ? 

mla-tanaji-sawant-
mla-tanaji-sawant-

नवी दिल्ली  : राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक  घेण्यात  येणार  असून  4 फेब्रुवारीला  मतमोजणी  होणार  आहे. 


 यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा 5 डिसेंबर  2020 पर्यंत  आहे. त्यामुळे 1फेब्रुवारी ते 5 डिसेम्बर या दहा महिन्यांसाठी कोण आमदार होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे . 


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना अलीकडच्या काळात फारच वेळ 'खर्च' करावा लागते. या निवडणुकीत कोटीच्या कोटींची उड्डाणे होतात . त्यामुळे प्रचंड वेळ खर्च करून मिळवलेलं आमदारपद फक्त10 महिने टिकणार असेल तर काय ? शिवाय काही महिन्यातच पुन्हा पक्षाचे तिकीट मिळविण्यापासून सर्वच तयारी करावी लागणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा  आहे.  निवडणूक बिनविरोध  झाली तरच  काही होऊ शकते असे इच्छुकांना वाटते . 


 यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने आज यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

यवतमाळ विधान परिषदेच्या जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे.  7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15  जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल.  17 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com