ऐन आखाडात तानाजी सावंतांच्या कृपेने खेकड्याचा महाराष्ट्रभर धुमाकूळ

खेकड्यांनी धरण फोडले, या जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानानंतर सोशल मिडियाला आयता विषय़ मिळाला. `सरकारनामा`च्या फेसबुक पेजवर शेकडो जणांनीआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच इतरत्रही हाच विषय होता.
ऐन आखाडात तानाजी सावंतांच्या कृपेने खेकड्याचा महाराष्ट्रभर धुमाकूळ

पुणे : खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटले, अशी माहिती देणाऱ्या जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.

तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अर्थ मुव्हींगचा व्यवसाय करायचाय जेसीबी घेऊ की खेकडा या व अशा आशयाचे अनेक विनोद सोशल मीडियावर फिरत आहेत. विशेष म्हणजे खेकड्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

शिवसेनेच्या आमदाराला वाचविण्यासाठी जलसंधारण मंत्री सावंत आणि सारेच सत्ताधारी बिचाऱ्या खेकड्यावर नाव घेत आहेत. या निमित्ताने काहींना अशी टीका करण्यात येत आहे. चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 24 जण वाहून गेले आहेत. इतक्‍या गंभीर विषयावर सावंत यांच्यासारखे जबाबदार मंत्री असे बेजबाबदार वक्तव्य कसे काय करू शकतात, असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे. 

विशेष म्हणजे या घटनेबाबत बोलताना खेकड्याच्या विषयावरून आपल्याला टार्गेट केले जाऊ शकते, असे लक्षात आल्याने सावंत यांनी ही माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे, अशी सारवासारव केली होती. मात्र, आधिकाऱ्यांनी माहिती दिली असली तरी मंत्री म्हणून जबाबदारीने बोलायचे असते, हे सावंत यांच्या लक्षात न आल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. 

यातील काही नमुने

खेकड्याने धरण फोडले '
आमदार म्हणाले-
'आम्ही अभियंत्याला झोडले'
आम्ही या महापुरूषांना
कोपरापासून हात जोडले
खेकडे, कुर्ल्या ,चिंबो-या
सर्व पक्षात दिसतात
अंधार होताच
ठेकेदाराजवळ बसतात

-रामदास फुटाणे

............

अर्थमुव्हर्स चा व्यवसाय करायचा आहे ...
JCB घेऊ का खेकडा ⁉

........

सिंघम चित्रपटातल्या चंद्रकांत शिक्रे या व्यक्तीरेखेच्या "तू चिटींग करता है रे' या डायलॉगची आठवण झाली.जयकांत शिक्रेप्रमाणे खेकडासुद्धा राजकारण्यांनो तुम्ही चिटींग कराताय, असे म्हणत असेल,

........

#तिवरे_धरण फोडणारा 'खेकडा' लष्कर - ए - तयबाचा...! हिरवं शेवाळ लागलं होतं नांगीला.! NIA चा खळबळजनक तपास वा शोध...!

............

`सरकार'ने खेकड्यांना तात्काळ अटक करावी व दोषी अधिकाऱ्यांना #उत्कृष्ट अभियंता' पुरस्कार द्यावा...

............................

 Arrest ALL the responsible Kekdes, and put them in the jail permanently ! So that they don't damage other Dams in the state !!!

...................

जलसंधारण मंत्री यांच्या आदेशावरून एका खेकड्यास अटक करण्यास सुरुवात धरण फोडल्याची खेकड्यानी दिली कबुली,बाकी खेकडे भीतीपोटी फरार

..................

वाहून गेलेल्या खेकड्यांच्या कुटुंबाला लवकरच चार पाच लाखाची मदत जाहीर" अशी बातमी टीव्ही वर येईल, आधीच सावध करतोय. ..

.............

हे मंत्री लहानपणापासून सीना नदीवर खेकडे धरुन मोठे झालेत. त्यामुळे यांना खेकडयाचा खूप दांडगा अनुभव आहे..

.................

असे महान सत्यशोधक विचारवंत पाच पंचवीस मंत्री जर असतील तर महाराष्ट्राचे कल्याणच झाले म्हणून समजा

........... 

खेकडयावर महाराष्ट्र सरकार `सर्जिकल स्ट्राइक` करण्याच्या तयारीत... कारण धरण फोडले


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com