तानाजी सावंतांची परांडा विधानसभेची पूर्वतयारी पिंपरी-चिंचवडमधून !  

विधानपरिषद सदस्य असलेल्या तानाजी सावंतांचा आगामी विधानसभा निवडणूक भूम-परांडा मतदारसंघातून लढविण्याचा विचार आहे. त्याची तयारी म्हणून हा सत्काराचा घाट घातला गेल्याची चर्चा आहे.
sawant-Omraje.
sawant-Omraje.

पिंपरीः मराठवाड्यातील भूम, परांडा, वाशीकर पिंपरी-चिंचवडकरांचा येत्या रविवारी (ता.21) शहरात स्नेहमेळावा होत आहे. त्यात शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि राज्याचे जलसंधारणमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे.

विधानपरिषद सदस्य असलेल्या तानाजी सावंतांचा आगामी विधानसभा निवडणूक भूम-परांडा मतदारसंघातून लढविण्याचा विचार आहे. त्याची तयारी म्हणून हा सत्काराचा घाट घातला गेल्याची चर्चा आहे.

मात्र, ओमराजे खासदार म्हणून निवडून आल्याने आणि आ.सावंत कॅबिनेटमंत्री झाल्याने हा सत्कार करण्यात येत असल्याचे भूम, परांडा, वाशी रहिवासी पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष युवराज कोकाटे व निमंत्रक चंद्रकांत सरडे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या भूम,परांडा व वाशी येथील मूळ रहिवाशांनी या स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.  

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात नुकतीच सावंत यांची वर्णी लागली.शहरातील भाजपचे आमदार  लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ते व्याही आहेत. शहरात त्यांची कॉलेजस आहेत. विधानसभा भूम, परांडा मतदारसंघातून लढविण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला पक्षाने ग्रीन सिग्नलही दिला आहे असे समजते .  म्हणून ते तयारीला लागले आहेत.

त्याचा एक भाग म्हणून भूम,परांडा, वाशी येथील पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांचा रविवारी मेळावा होत आहे. त्यात सावंत व उस्मानाबादचे खासदार ओमराजे यांचा सत्कार होत आहे. यावेळी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार गजानन बाबर, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित राहणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com