जाणता राजाने पळवलेले मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळवणार : तानाजी सावंत 

..
Sawant-Nimbalkar
Sawant-Nimbalkar

पिंपरीः 'जाणता राजा'ने गेले पन्नास वर्षे पळवलेले मराठवाड्याचे हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळवणारच.ते हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,अशी राणा भीमदेवी थाटातील गर्जना राज्याचे जलसंधारणमंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केली. पिंपरी - चिंचवडमधील भूम,परांडा,वाशी ( जि.उस्मानाबाद, मराठवाडा )रहिवाशी संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री झाल्याने सावंत,तर उस्मानाबादहून खासदार म्हणून निवडून आल्याने ओमराजे निंबाळकर यांचा पिंपरी-चिंचवड निवासी भूम,परांडा,वाशीकरांनी  नागरी सत्कार केला.यावेळी मनोगतात ना. सावंत यांनी वरील आव्हान दिले. माजी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर,इरफान सय्यद, रोमी संधू,युवराज कोकाटे आदी यावेळी व्यासपीठावर होते.

खा. निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात ना.सावंत यांचे कौतूक केले. ते म्हणाले, मी आमदार असताना अनेक मंत्री पाहिले. ते हवेतच होते. त्यामुळे 19 वर्षात 19 टीएमसी पाणी ते अडवू शकले नाहीत.दुसरीकडे सावंत हे पदाचा गर्व न करणारे आहेत. त्यांनी फक्त एक महिना दोन दिवसांत 135 बंधाऱ्यांना मंजुरी दिली. साडेपाचशे बंधाऱ्यांचे जीआर काढले. एवढेच नाही,तर भूम,परांडा,वाशी तालुक्यात पाचशे किलोमीटर नाले,नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने केले. 

त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशांना पोटापाण्यासाठी पुण्या,मुंबईला जावे लागणार नाही. 19 वर्षे मराठवाड्यातील पाटबंधारेमंत्री असताना 19 टीएमसी मराठवाड्याचे पाणी त्यांना अडविता आले नाही. त्यामुळे मराठवाडाकरांना गाव सोडून पुणे,मुंबईला यावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख हा तत्कालीन पाटबंधारेमंत्री पदमसिंह पाटील यांच्या दिशेने होता.पण,त्यांनी त्यांचे नाव घेतले नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com