...तरी जनता गाढवच ठरवणार : तानाजी सावंतांचा राणा जगजितसिंहना टोला

उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यानी जाहीर केले आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघ युतीमध्ये सेनेच्या वाट्याला आहे. तिथे या जागेवरुन चांगलाच वाद रंगणार असल्याचे चिन्हे आतापासुन निर्माण होऊ लागली आहेत.
Rana Jagjitsinh - Tanaji Sawant
Rana Jagjitsinh - Tanaji Sawant

उस्मानाबाद : गाढव घोंगड पांघरुन वाघाच्या कळपात गेला तरी जनता त्याला गाढवच ठरवणार असल्याचा टोला जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यानी भाजपात प्रवेश करणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांना उद्देशुन लगावला. भाजपच्या स्थानिक नेत्यांना त्यानी जरा सावध रहावे, असा सल्लाही देऊन टाकला. शिवसेना आता सजग व सावध असल्याचे सांगुन २०१४ सारखे आम्ही गाफील नसल्याचाही त्यानी उल्लेख केला. एस.टी. महामंडळाच्या माध्यमातुन शहरामध्ये नव्याने उभा राहणाऱ्या बसस्थानकाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रा. सावंत यांनी हे वक्तव्य केले. 

त्यांच्या या वक्तव्यावरुन येणाऱ्या काळात राणा जगजितसिंह पाटील व शिवसेना यांच्यात चांगलाच संघर्ष पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याची एकही जागा भाजपला सोडणार नसल्याचे सांगुन त्यानी जागावाटपाच्या तिढ्यावरही बोट ठेवले आहे. उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यानी जाहीर केले आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघ युतीमध्ये सेनेच्या वाट्याला आहे. तिथे या जागेवरुन चांगलाच वाद रंगणार असल्याचे चिन्हे आतापासुन निर्माण होऊ लागली आहेत. 

माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळविल्याने नवा गडी मैदानात उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून कऱण्यात आली आहे. तर भाजपकडुन आमदार पाटील यांच्यासाठी या जागेचा आग्रह केला जाण्याची शक्यता वर्तविली जाऊ शकते. त्यामुळे प्रा.सावंत यांनी आतापासुनच ही जागा सोडणार नसल्याचे जाहीर करुन वादाला तोंड फोडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com