स्थानिक पदाधिकाऱ्यांची आधी सावंतांविरोधात तक्रार.. आता आले टेन्शन!

सोलापुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंत बंधूंच्या विरोधात थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याच्या घटनेपासून तानाजी सावंत गायब होते. सावंत यांनी जयवंतराव सावंत प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याने सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना टेन्शन आल्याची चर्चा आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांची आधी सावंतांविरोधात तक्रार.. आता आले टेन्शन!

सोलापूर :  शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत हे गेल्या महिन्याभरापासून गायब होते. उस्मानाबादमध्ये होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत.

माजी शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह सावंत समर्थकांनी सोलापुरातील विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर ठाकरे आणि सावंत यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ठाकरे यांनी सावंत यांचा सन्मान करून भविष्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचं आश्‍वस्त केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा सावंत यांच्याविषयी चर्चा रंगली आहे.

सावंत यांनी फक्त सामुदायिक विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली आहे. पक्षाचे संघटन किंवा अन्य कोणत्याही विषयावर त्यांची चर्चा झाली नसल्याचे विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत, वरुण सरदेसाई यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची मुंबईत बैठक घेतली आहे. पक्ष संघटन वाढवण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत असलेले जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सोलापूर महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बरडे यांनी नगरविकास मंत्र्यांशी चर्चा केली. गेल्या काही वर्षांत शासनाकडून आलेला विकास निधी, त्यातून झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी बरडे यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com