नगरमध्ये कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. तांबे यांच्या नावाची चर्चा

 नगरमध्ये कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. तांबे यांच्या नावाची चर्चा


नगर : नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर लवकरच नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची त्यासाठी चर्चा असून, हे नाव जवळजवळ निश्‍चित झाल्याचे समजते. डॉ. तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत. केंद्र व राज्यातील कॉंग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. 

गेल्या सात जूनला मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी, नगरच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत मांडले होते. नगर जिल्ह्याची चर्चा सुरू झाली तेव्हा विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे व डॉ. तांबे यांची नावे प्राथमिक चर्चेत आली. त्यावर देशमुख यांनी, आपल्याला आता जिल्हास्तरावर काम करण्यात रस नसल्याचे सांगितले. नागवडे दाम्पत्याने, शरद पवार सांगतील त्या वेळी "राष्ट्रवादी'त प्रवेश करू, असे भाष्य केले होते. नागवडे यांचे नाव चर्चेत येताच ही बाब पुढे आली. त्यामुळे त्यांच्या नावावर फुली पडली. त्यानंतर नगर जिल्ह्यातून आलेल्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी डॉ. तांबे यांना अध्यक्ष करण्याची एकमुखी मागणी केली. त्याला नेत्यांनी मान्यता दिली. त्यामुळे लवकरच डॉ. तांबे यांचेच नाव निश्‍चित होणार असल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com