तलाठ्यांनी सहकार्य केले अन् सातबारे आॅनलाइन झाले

डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळण्यासाठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे. तेथे जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक आदी माहिती भरावी. त्यानंतर पीडीएफ स्वरुपातील डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा दिसेल. तो प्रिंट काढून वापरता येईल. सर्व शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्यावर पुन्हा कुठलीही स्वाक्षरी करण्याची गरज नाही.आपली चावडी (http://mahabhumi.gov.in/aaplichawdi) हे संकेतस्थळ डिजिटल नोटीस बोर्ड असून यावर आपल्या गावातील जमिनीच्या नोंदणीचे फेरफार, फेरफाराची स्थिती आदींची माहिती उपलब्ध होणार आहे.
तलाठ्यांनी सहकार्य केले अन् सातबारे आॅनलाइन झाले

पुणे : राज्यात सातबारा संगणकिकृत झाल्याने कारभारात गतिमानता येणार आहे. या डिजिटल क्रांतीसाठी प्रत्येक गावातील मिळून सुमारे १६ हजार तलाठ्यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती संगणकिय प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
 
महाराष्ट्र दिनापासून तलाठ्याची स्वाक्षरी असलेला सातबारा आॅनलाइन उपलब्ध झाला आहे. या नुसार तब्बल ११ लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारे आता आनलाइन उपलब्ध आहेत. एक मे ते एक आॅगस्ट या महसूल दिनापर्यंत हे सातबारे मोफत मिळणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना जगताप म्हणाले, `` हे खूप मोठे काम होते. प्रत्येक महसूल विभागात वेगेगळ्या प्रकारे सातबारा लिहिण्याची पद्धत होती. आॅनलाइन सातबारे करताना यात समानता आणण्यात आली. हे बदल करण्यासाठी तलाठी संघटना, मंडलाधिकार संघटना, त्यांचा महासंघ यांनी विधायक भूमिका घेतली. फक्त आम्हाला सोयीसुविधा द्या. कनेक्टिव्हिटी द्या, अशा त्यांच्या मूलभूत मागण्या होत्या. या सर्व संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हे काम केले म्हणून आपण या प्रकल्पात ही उंची गाठण्यात आली. मुख्यमंत्री आणि महूसलमंत्री यांनीही या संघटनांच्या सकारात्मक कामाचे कौतुक केले आहे. महसूल विभागाची आणि तलाठ्यांची प्रतिमा उंचावणारा हा प्रकल्प आहे.``

याविषयी जगताप म्हणाले, `` 2002 पासून सातबारा संगणकीकृत करण्यात आला. परंतु फेरफार संगणकिकृत झाला नव्हता. त्यानंतर 2011 मध्ये आॅनलाईन सातबारा व आॅनलाईन फेरफार देण्यात यावा. असा आदेश सरकारने दिला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया करण्यात आली. 2012 ते 2014 या काळात सर्व डेडा क्लिन करण्यात आला. त्यानंतर जानेवारी 2015 पुढे ज्या तालुक्याचा डेटा तयार झाला. त्यानंतर आॅनलाईन सातबारा व आॅनलाईन फेरफार देण्याचे बंधन करण्यात आले. राज्यात अडीच कोटी सातबारा आहेत. त्यासाठी 9 डेटा सर्व्हर आहेत. साडेसात कोटी च्या दरम्यान खातेदार आहेत. दरवर्षी 20 ते 25 लाख फेरफार राज्यभरात होतात. दरवर्षी पीक पहाणी करावी लागते. हा डेटा महसुल विभागाने पूर्ण  केला होता. त्यात कामगार तलाठी यांचा मोलाचा वाटा होता. 

राज्यात अचूक सातबारा होण्यासाठी 1 जानेवारी 2017 मध्ये  चावडी वाचन करण्यात आले. यामध्ये हस्तलिखित सातबारामध्ये ज्या नोंदी झाल्या आहेत त्या आनलाईन सातबारामध्ये टायपिंग करताना चुका राहून गेल्या आहेत का ? काही कंसातील नावे आली आहेत का ? काही नावे वगळली गेली आहेत का ? ज्या व्यक्ती मयत झाले आहेत किंवा ज्या व्यक्तींनी जमिनी विकली आहेत त्यांच्या नोंदी कशा झाल्या आहेत. याबाबत खातरजमा करणे यासाठी चावडीवाचन करून सातबारा व 8 अ मध्ये बिनचुकपणा आणणे गरजेचे आहे. हे काम कामगार तलाठी, मंडलअधिकारी , तहसीलदार, विभागीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com