Take review of Minister"s work | Sarkarnama

मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्या 

ब्रह्मदेव चट्टे :सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 27 मार्च 2017

आमदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी पक्षप्रमुखांनी एक दोन तासांची प्रदीर्घ बैठक घेत आमदारांचे म्हणने ऐकून घेतले असल्याची माहितीही सुत्रांनी दिली. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा आणि मंत्रीपदाची भाकरी फिरवण्याची मागणी आमदरांनी केली आहे.

मुंबई: राज्याच्या सत्तेत वाटेकरी होवून शिवसेनेला दोन वर्ष झाली आहेत. गेल्या दोन वर्षातील मंत्र्यांच्या कामगिरीवर शिवसेनेचे आमदार नाराज असून तशी तक्रारही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आमदारांनी केली असल्याचे समजते. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेवून मंत्रीपदाची भाकर फिरवण्याची मागणी शिवसेनेतील काही आमदारांनी केले असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे.   

राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी सहा महिने उशिर करणाऱ्या शिवसेनेने अगोदरच उशिर केला आहे. नाही होय करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यामुळे शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्रीपदांचा वाट मिळाला. मात्र, या मंत्री पदाचा आमदारांना प्रत्येक्ष काही फायदा होत नसून शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे तक्रार शिवेसेना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली. विधीमंडळाच्या अधिवेशानात विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांना विश्‍वासात न घेताच अर्थसंकल्पाच्या लेखानुदान विना चर्चामंजूर करण्यात आले. त्यावेळी आम्हाला बोलायचे असा शिवसेनेच्या आमदारांनी हट्ट धरला होता. त्यानंतर कर्जमुक्तीवर औचितेच्या चर्चेद्वारे सेना आमदारांना शांत करण्यात आले. त्यामुळे मंत्री आम्हाला विश्‍वासात घेत नसल्याची भावना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली. 

आमदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी पक्षप्रमुखांनी एक दोन तासांची प्रदीर्घ बैठक घेत आमदारांचे म्हणने ऐकून घेतले असल्याची माहितीही सुत्रांनी दिली. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा आणि मंत्रीपदाची भाकरी फिरवण्याची मागणी आमदरांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करणार असल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगत शिवसेनेच्याही मंत्र्यांच्या कामगिरीनुसार इतरांना संधी देण्याची आमदारांनी मागणी केली आहे. आमदारांच्या मागणीला पक्षप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये बदल होणार असल्याचा दावाही सुत्रांनी केला आहे. 
    
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख