शहाजहानने ताजमहाल बांधलेला नाही : डॉ. ओक

'ब्रिटिशांनी फोडा व झोडा' ही रणनिती आखून भारतातील अनेक गोष्टी बिघडवल्या. इतिहासाची तोडफोड करताना दोन धर्मांमध्ये युद्ध लावून दिले.
taj-mahal
taj-mahal

रत्नागिरी : ब्रिटिशांनी 'ताजमहाल'च्या बाबतीतही अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. देशातील स्फोटक स्थिती पाहता ताजमहालबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. एक लेखक कलाकार म्हणून मी नाट्यकृती लिहिली. देशात सर्वधर्मसमभाव या भावनेतून पुढे जायचे असेल तर इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत, असे प्रतिपादन लेखक डॉ. विद्याधर ओक यांनी केले. 

खल्वायन संस्थेच्या 'संगीत ताजमहाल' नाटकाने 59 व्या मराठी संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सांघिक प्रथमसह 10 पारितोषिके पटकावली. डॉ. ओक यांना लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. आज रत्नागिरीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, 'ताजमहाल'च्या निमित्ताने ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. 2013 मध्येच नाटक लिहून पूर्ण झाले होते. मित्र नारायण सरदेसाई यांनी हे संहिता वाचून कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना सांगितले. त्यांनी 'खल्वायन'शी भेट घालून दिली आणि नाटक रंगमंचावर आले. 

डॉ. ओक म्हणाले, शहाजहानच्या बादशहानामामध्ये राजा मानसिंग यांचा राजवाडा जो त्यांचा नातू राजा जयसिंग यांच्या ताब्यात होता, तो मुमताजची कबर बांधण्यासाठी घेतला, अशी नोंद आहे. म्हणजे बादशहाने ताजमहाल बांधलेला नाही. 250 फूट उंचीचा व पायासुद्धा 250 फूट खाली असलेल्या या राजवाड्याची निर्मिती एक वर्षात झालेली नाही, असा निष्कर्ष काढता येतो. ताजमहालमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर मुमताजची कबर आहे. एकाच व्यक्‍तीच्या दोन कबर कुठेही नाहीत. कबरीभोवती प्रदक्षिणा मार्ग कशाला, कबरीच्या वर अभिषेक पात्रासाठी हूक व साखळी आहे, घुमटावर तेलाचे दिवे लावण्यासाठी लोखंडी हूक कसे, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत, असे डॉ. ओक म्हणाले. 

ताजमहालच्या नदीकिनारी भागात दोन जिने आहेत. सध्या ते जाळी टाकून बंद केले आहेत. त्या खोल्या बंद आहेत. येथील लाकडी दरवाजाची कार्बन डेटिंग चाचणी केल्यानंतर ते शहाजहानपूर्वी तीनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. येथे गोशाळा, अश्‍वशाळा आणि दोन नगारखानेही आहेत. याबाबत भारतीय पुरातत्व खात्याने छडा लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com