ताजमहाल भारतीयांचाच : योगी 

ताजमहाल भारतीयांचाच : योगी 

नवी दिल्ली : "ताजमहाल कोणी आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नसून, तो भारतीय कामगारांच्या रक्त आणि घामातून तयार झाला असल्याने तो भारतीयांचाच आहे,' असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केले. 

भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल देशद्रोह्यांनी बांधला असल्याचे विधान केल्यानंतर बरीच टीका झाल्यामुळे राज्य सरकारकडून आज ही सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. "ताजमहाल ही जागतिक दर्जाची वास्तू आहे. जगभरातील नागरिकांसाठी हे पर्यटनासाठी आकर्षणबिंदू आहे. त्यामुळे पर्यटकांना उत्त सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. त्यामुळे ताजमहाल आणि परिसराच्या विकासासाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मी या भागाला भेट देणार आहे,' असे आदित्यनाथ यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ हे 26 ऑक्‍टोबरला आग्य्रालाही जाणार असून यावेळी ते ताजमहाल आणि इतर ऐतिहासीक स्थळांची पाहणी करतील, असे सूत्रांनी सांगितले. आग्य्राचा विकास घडवून आणण्यासाठी 175 कोटी रुपयांचा प्रकल्प आखला असल्याचे उत्तर प्रदेश पर्यटन मंडळाचे म्हणणे आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com