Tablighi Jamaat Program Should Have beed Avoided Say Sharad Pawar
Tablighi Jamaat Program Should Have beed Avoided Say Sharad Pawar

तबलीगचा सोहळा टाळायला हवा होता : शरद पवार

तबलीग जमातीचा निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. पण टाळला नाही. याची किंमत आता सर्वांना मोजावी लागण्याची शक्‍यता आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करताना केले

सातारा : तबलीग जमातीचा निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. पण टाळला नाही. याची किंमत आता सर्वांना मोजावी लागण्याची शक्‍यता आहे. आता पुन्हा एकदा आठ एप्रिलला शब्ब- ए-बरात निमित्ताने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ कब्रस्थानात नमाज अदा करणार आहे. पण माझी एक सूचना आहे त्यांनी जे काय करायचे ते घरात बसून करावे. एकत्रित कब्रस्थानात जाण्याचा हा प्रसंग नाही. जे निजामुद्दीला घडले ते पुन्हा आठ एप्रिलला आम्ही घडून देणार नाही, याबाबत मुस्लिम समाजाने भुमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतानाच प्रशासन व नागरीकांनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात श्री. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, "नुकतेच दिल्लीत निजामुद्दीनला मरकतचे आयोजन केले होते. त्यावेळी हजारो लोक देशाच्या अनेक भागातून तेथे गेले. तेथून ते आपापल्या गावी गेले. त्यातील काही लोकांनी या रोगाला बरोबर घेऊन प्रवास केला. त्यानंतर हा रोग फैलवत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. आजची परिस्थिती लक्षात घेऊन काहीतरी पथ्ये पाळली गेली पाहिजेत. मला सूचवायचे आहे की, तबलिकांनी निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. पण टाळला नाही. त्याची किंमत आता सर्वांना मोजावी लागण्याची शक्‍यता आहे.''

''दुसरा मुद्दा म्हणजे आठ एप्रिलला शब्ब- ए-बरात होत आहे. यानिमित्ताने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ कब्रस्थानात नमाज अदा करतात. पुन्हा एकदा मुस्लिम समाज अशा कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. त्यामध्ये त्यांचे नातेवाईक जे हयात नाहीत त्यांच्याविषयी ते प्रार्थना करतात. पण मला एक सांगायचे आहे. जे काय करायचे ते घरात बसून करा. एकत्रित कब्रस्थानात जाण्याचा हा प्रसंग नाही. जे निजामुद्दीला घडले ते पुन्हा आठ एप्रिलला आम्ही घडून देणार नाही, याबाबत मुस्लिम समाजाने भुमिका घ्यावी, असे मला वाटते. याबाबत सर्वांनी मिळून निर्णय घेणे गरजेचे आहे,'' असेही आवाहन पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com