`तबलीग जमात`ने देशाची माफी मागावी : `मुस्लिम सत्यशोधक`ची मागणी

तबलीग जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या तीस टक्क्यांनी वाढल्याचा ठपका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठेवला आहे.
shamsuddin-tamboli
shamsuddin-tamboli

पुणे : दिल्ली येथील मरकजमध्ये तबलीग जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येस तबलीग जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलीगच्या असंवेदनशील  वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तबलीगने देशाची माफी मागावी, अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे.

मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी ही मागणी केली आहे. तबलीगच्या वर्तनाचा समाचार घेत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उघ्दव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच पोलिस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.

राज ठाकरे यांनी तबलिगला कसली ट्रिटमेंट देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे." असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लीमांची असुरक्षितता वाढत असतानाच करोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलीग जमातने ताबडतोब तोबानामा करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी प्रा. डॉ. तांबोळी यांनी केली आहे.

येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिद मध्ये नमाज आदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लीम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज आदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट - अलिंगन दिले जाते. हे सर्व  करोना विषाणु पसरवण्यात आणि करोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील ह्या  संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा  आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवावे. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ सर्वांना करीत आहे, 
असे तांबोळी यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com