दिल्लीतील तबलिगच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती : शरद पवार 

माझ वाचनात श्री. राजन यांचे एक वाक्‍य आले. या सगळ्या परिस्थितीनंतर जे संकट येणार आहे, ते रोजगाराचे असेल. रोजगार बुडण्याचे प्रमाण वाढणार आहे. याबाबत अमेरिकेतील सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे.
 दिल्लीतील तबलिगच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती : शरद पवार 

सातारा : कोरोनाची परिस्थिती सावरल्यानंतर रोजगार निर्मिती कशी करायची याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन महाराष्ट्रात सरकारने तातडीने पावले टाकून बेरोजगार व इतर प्रश्‍नातून बाहेर कसे पडता येईल, याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे. 

निजामुद्दीनला जायला नको होते, दिल्लीत संमेलन घ्यायला नको होते, या संमेलनांसाठी जी परवानगी दिली त्याची आवश्‍यकता नव्हती असेही श्री. पवार यांनी नमूद केले. 

कोरोना रोगामुळे समाजाच्या आरोग्य व अर्थकारणावर विपरित परिणात होत आहे, असे विविध क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. उद्योग, व्यवसाय बंद असल्याने अर्थव्यवस्था बिघडणार आहे. केवळ देशाच्या नव्हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. या सगळ्या परिस्थितीनंतर जे संकट येणार ते रोजगार बुडण्याचे असेल. याबाबत अमेरिकेतील सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायक असल्याचेही श्री. पवार म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाढणारी रूग्ण संख्या आणि आगामी काळात नागरीकांनी घ्यावयाच काळजी तसेच विविध ठिकाणी कार्यक्रमांच्या निमित्ताने लोक एकत्र येण्याचे प्रकार होत आहेत. ते तातडीने थांबविले पाहिजे, यासंदर्भात श्री. पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला तसेच काहींच्या प्रश्‍नांनाही उत्तरे दिली. 

निजामुद्दीनला जायला नको होते. दिल्लीत संमेलन घ्यायला नको होते, असे नमुद करून श्री. पवार म्हणाले, या संमेलनांसाठी जी परवानगी दिली त्याची आवश्‍यकता नव्हती. महाराष्ट्रातही अशा प्रकारची संमेलने घेण्याचा विचार विविध संघटनांनी केली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्र्यांनी विचार करून या संमेलनांना परवानगी नाकारली आहे. हीच खबरदारी दिल्लीत घेतली असती तर एखाद्या समाज व एखाद्या वर्गाविषयी वेगळे चित्र सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती. 

सोलापूरात बैल आणि घोडा यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. त्या ठिकाणी हजारो लोक जमले. सध्याच्या परिस्थितीत हा सोहळा आयोजित करण्याची गरज नव्हती. पण पोलिसांनी त्यांच्यावर खटले भरले.

सोलापूरात पोलिस व प्रशासनाने तत्परता दाखविली त्यामुळे हे प्रकरण तेथेच थांबले. हीच तत्परता दिल्लीत घेतली असती ते आज जे घडतय ते पहायला मिळले नसते. तरीही दिल्लीत जे घडले ते सातत्याने माध्यमातून दाखविण्याची गरज नाही. त्यातून आपण काय सिध्द करतोय याचा विचार करायला हवा. 

लॉकडाऊनाचा आजचा 13 वा दिवस आहे. आता दिवस कमी कमी होत आहे. आपण उर्वरित दिवसात काळजी घेतली तर कोरोनाच्या रोगावर निश्‍चितपणे मात करण्यात यशस्वी होऊ. पहिल्या दोन स्टेज महत्वाच्या आहेत. या रोगामुळे समाजाच्या आरोग्य व अर्थकारणावर विपरित परिणात होत आहे, असे विविध क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

उद्योग, व्यवसाय बंद राहिले आहेत. याचा परिणात अर्थव्यवस्थेवर होणार आहे. केवळ देशाच्या नव्हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार आहे. 

कोरोनाची परिस्थिती सावरल्यानंतर रोजगार निर्मिती अशी करायची याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन महाराष्ट्रात सरकारने तातडीने पावले टाकून बेरोजगार व इतर प्रश्‍नातून बाहेर कसे पडता येईल, याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. 

यासाठी देशाच्या अर्थविभागाचे जबाबदारीचे काम उत्तमरितीने संभाळलेले विजय केळकर यांच्यासारख्या व्यक्तींना एकत्र करून अर्थकारणाला तोंड कसे द्यायेच हे ठरविले पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांनी हे सर्व मान्य करून पावले टाकायची तयारी केली आहे. 

आर्थिक पॅकेज देण्याची गरज.... 
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना केंद्र सरकारने विविध राज्यांना अर्थिक संकटातून बाहरे पाडण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. देशाच्या शेती क्षेत्रालाही मार्गदर्शन करायला हवे.

गव्हाचे उत्पादन उत्तर भारतात आणि तांदळाचे उत्पादन दक्षिणेत मोठ्याप्रमाणात होते. सध्या काही ठिकाणी रब्बीची पिके शेतातच आहेत. काढणी झालेली नाही. याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर होणार आहे. हा रब्बी हंगाम कसा घ्यायचा याचे नियोजन कार्यकम आखणे गरजेचे आहे. याचा विचार निश्‍चित केला जाईल. 

सोशल मिडियावर खोटे संदेशामुळे संभ्रम... 
कोरोना विरोधातील लढ्यात संपूर्ण समाज, राज्य, केंद्र यांनी एकजूट दाखविणे गरजेच आहे. सध्या व्हॉटसऍप व सोशल मिडियवर येणारे काही संदेश हे काळजी करण्यासारखे आहेत. यातील काहींची तपासणी केली असता पाच संदेशातील चार संदेश खोटे असतात. 

या माध्यमातून लोकांत संभ्रम निर्माण केला जात आहे. हे वास्तव चित्र पुढे आले आहे. या माध्यमातून समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काहीजण करतात की काय, याची शंका येते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com