Swatantra Bharat Paksh will contest 70 seats in Maharashtra " Anil Ghanwat | Sarkarnama

शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातू 70 जागा लढविणार : अनिल घनवट

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सन २००१ मधे टास्क  फोर्सच्या माध्यमातून भारत उत्थान कार्यक्रम दिला आहे. सदर कार्यक्रम लागू करण्यास तयार असलेल्यांनाच पाठींबा देऊन त्यांना सरकार स्थापन करण्यास मदत करणार. 

-अनिल घनवट

हिंगोली :  आगामी विधानसभा निवडणुका शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून सत्तर जागा लढविणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी शुक्रवारी (ता.२८)  बोलतांना दिली आहे. 

यावेळी बोलतांना श्री. घनवट म्हणाले की," आगामी निवडणुका कृषी धोरणावर होणे आवश्यक आहे. शेतीमालास भाव नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. शेती उत्पादन वाढल्यानंतर निर्यातबंदी करायची अन उत्पादन कमी झाल्यानंतर परदेशातून शेतीमाल आयात करून भाव पाडायचे अशीच भूमिका  आतापर्यंतच्या सरकारने  घेतली आहे . "

" राज्यातील निवडणुकांमधे जाती व धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. मात्र आता अर्थवादाच्या मुद्यावर मतांचे ध्रुवीकरण झाले पाहिजे अशी आमची भूमिका  आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून सत्तर जागा लढविणार आहे. यावेळी त्रिशंकू स्थिती राहिल्यास समाजवादी धोरणे राबविणाऱ्याच्या  पाठीशी शेतकरी संघटना उभी राहणार आहे." असे  श्री. घनवट यांनी स्पष्ट केले. 

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी गीता खांदेभराड, सतीश दाणी, अनिल चव्‍हाण, सीमाताई  नरोडे, ब.ल. तामसकर, उत्तमराव वाबळे, गोरख पाटील आदी उपस्‍थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख