Swabhimani Shetkari Sanghatana workers | Sarkarnama

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना फसवणारा दलाल पकडला

संपत मोरे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेकडो द्राक्षबागायत शेतकऱ्यांना 2 कोटीचा गंडा घालून फरार असलेल्या विशाल मोरे या दलालाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस पाच महिने मोरेला शोधत होते मात्र पोलिसांना जे जमले नाही ते काम शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

विशाल मोरे हा दलाल शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयाला गंडवून  फरार झाला होता.गेल्या पाच महिन्यापासून तो फरार आहे.काल घरी तो माळवाडी(ता पलूस)येथील त्याच्या घरी आल्याचे समजताच  शाहरुख मुजावर, नितिन शिकारखाने, चंद्रकांत दगडे,दयानंद शिकारखाने, किरण शिकारखाने हे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहोचले. त्याना बघून मोरे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.मात्र त्याला पकडून ठेवले.यावेळी झटापट झाली.कार्यकर्त्यांनी यावेळी मोरेला बेदम चोपले. आणि भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले,"कवठेमहांकाळ पोलिसांना विशाल मोरे याला आमच्या कार्यकर्त्यांनी पकडले .त्याला पकडल्यावर त्याच्या विरोधात ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.त्या कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फोन केला.

पण पोलिसांनी आम्हाला सांगितले आमच्याकडे गाडी नाही.तुम्हीच त्याला घेऊन या.'पोलिसांचे काम आम्ही केले तरीही पोलीस कंटाळा करत होते.याचे दुःख वाटते.आरोपी आम्हीच पकडायचे त्याला न्यायला गाडीही आम्हीच द्यायची मग पोलिस खाते कशासाठी हा प्रश्न आहे ."असा प्रश्न खराडे यांनी विचारला.
 "तुमच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला का मारले?" असे विचारल्यावर खराडे म्हणाले,"जो शेतकऱ्यांना फसवेल त्याला आम्ही असेच चोपणार आहोत."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख