`स्वाभिमानी'ची उद्या साखर सहसंचालक कार्यालयावर धडक

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे पैसे जमा न केल्याने या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी (ता.1) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता दसरा चौकातून हा मोर्चा निघणार असून त्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी दसरा चौकात जमण्याचे आवाहन खासदार राजू शेटटी यांनी केले आहे.
`स्वाभिमानी'ची उद्या साखर सहसंचालक कार्यालयावर धडक

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे पैसे जमा न केल्याने या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी (ता.1) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता दसरा चौकातून हा मोर्चा निघणार असून त्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी दसरा चौकात जमण्याचे आवाहन खासदार राजू शेटटी यांनी केले आहे. 

या मोर्चास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 

कोल्हापूर विभागातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. वेगवेगळी कारणे सांगून कारखाने एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत.

प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळवून दिली पाहिजे. यासाठी संघटनेकडून साखर कारखाने व साखर सहसंचालकांना 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र एकाही कारखान्याने ही रक्‍कम जमा न केल्याने 1 जानेवारीला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. 

खासदार राजू शेटटी म्हणाले, "साखरेला दर नाही. साखर उचलली जात नाही, अशी एक ना अनेक कारणे सांगितली जात आहे. यातूनच 80-20 चा फॉर्म्युला पुढे केला जात आहे. मात्रतो आम्हाला मान्य नाही. एफआरपीची सर्व रक्‍कम एकरक्‍कमीच घेणार आहे. ही रक्‍कम देण्यास कारखान्यांना भाग पाडू. या सर्व कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे मान्य केले आहे. तरीही, जे कारखाने एक रक्कमी एफआरपी देणार नाहीत, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com