स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त : राजू शेट्टी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त : राजू शेट्टी 

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती या पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांना दिली. 

शेट्टी यांनी सांगितले, की प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून राज्यभरातील पदाधिकारी यांची एकाचवेळी नेमणूक होणार आहे. पक्षाची शिस्तपालन समिती कार्यरत करणार आहे.

कार्यकर्त्यांना तक्रारी करता येईल. विभागीय आणि राज्य पातळीवर शिस्तपालन समितीही स्थापन होणार आहे. चळवळ टिकवण्यासाठी संघटनेचा राजकीय स्वरूप होऊ नये. प्रदेश ते गाव पातळीवरील पदे निवडीचा कार्यक्रम पुढील महिनाभरात पार पडणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com