शिवसेनेनं चुप्पी साधली...आणि परिचारकांची विधानभवनात `एंट्री` झाली

शिवसेनेनं चुप्पी साधली...आणि परिचारकांची विधानभवनात `एंट्री` झाली

मुंबई : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन विधानपरिषदेत आज मागे घेण्यात आले. सभापती आणि  पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, निर्णयाला कॉंंग्रेसने कडाडून विरोध केला असताना शिवसेनेने ब्र शद्बही काढला नाही.

परिचारक यांना विधांनपरिषदेतून निलंबित करण्यात आले होते, तसेच विधानभवन परीसरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली होती. विधिमंडळ अधिवेशन काळात परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी अनेकदा केली होती. मात्र प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता. शिवसेना सत्तेत असतानाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी निलंबनास विरोध केला होता.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत परिचारक याना विधानभवनात प्रवेश करायला तसेच सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केला. काल गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे सभापतींनी सांगितले .यावेळी कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी या निर्णयाला विरोध केला. मात्र शिवसेनेचे आमदार गप्प बसून होते.

परिचारक यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना 9 मार्च 2017 ला दीड वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर नेमलेल्या उच्चाधिक्कार समितीचा अहवाल आल्यानंतर 28 फेब्रुवारीला 2018 रोजी परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव सभागृहात मंजूर केला होता, मात्र शिवसेना आणि विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परिचारक यांना विधानभवनात यायला बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com