कर्नाटक राज्यपालपदी सुषमा स्वराज चर्चेत

कर्नाटकाचे विद्यमान राज्यपाल वजूभाई वाला यांचा कालावधी ऑगस्ट अखेरीस संपणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या राज्यपालपदी लोकसभेच्या माजी सभाध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री उमा भरती व माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची नावे चर्चेत आहेत.
कर्नाटक राज्यपालपदी सुषमा स्वराज चर्चेत

बंगळूर  : कर्नाटकाचे विद्यमान राज्यपाल वजूभाई वाला यांचा कालावधी ऑगस्ट अखेरीस संपणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या राज्यपालपदी लोकसभेच्या माजी सभाध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री उमा भरती व माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची नावे चर्चेत आहेत.

केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारने काही राज्यांचे राज्यपाल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातही नुतन राज्यापालांची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. सुषमा स्वराज यांनी आरोग्याच्या कारणावरून केंद्रीय मंत्रिमंडळापासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाईल, यावर शंका व्यक्त होत आहे. शिवाय खाणसम्राट जनार्दन रेड्डी, श्रीरामलू, करुणाकर रेड्डी यांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्‍यता कमी असल्याचे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, काही जणांच्या मते त्यांना कर्नाटकाची समग्र माहिती असल्याने त्यांचीच राज्यपालपदी नियुक्ती होण्याची अधिक शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

माजी केंद्रीय मंत्री उमा भारतीसुध्दा सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. कर्नाटकाशी त्यांचा सतत संपर्कही आहे. त्यामुळे भाजप वर्तुळात त्यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे. सुमित्रा महाजन यांना वय झाल्याच्या कारणावरून मध्यप्रदेशच्या इंदूरमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. परंतु त्या आरएसएस व भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या नावाचाही कर्नाटकाच्या राज्यपालपदासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com