सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले 

सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले 

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडत असल्याची माहिती आज ट्विटरवरून दिली. 

8 सफदरजंग लेन सरकारी निवासस्थान सोडत असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे पूर्वीच्या पत्त्यावर आणि फोन नंबरवर आपण उपलब्ध नसल्याचे स्वराज यांनी नमूद केले. यापूर्वी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी निवासस्थान सोडले. 

प्रकृतीच्या कारणावरून सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. सरकारबाहेर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सुषमा यांनी ट्‌विटरवर भावनिक संदेश देत मोदींचे आभार मानले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com