पासपोर्ट मिल गया ना क्षीरसागरजी?  

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे ऑगस्ट २०१४ मध्ये कुटूंबियांसमोबत डेन्मार्क देशात सुट्यांसाठी गेले होते. मात्र, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा डॉ. दिपा क्षीरसागर यांची पासपोर्ट व पैसे असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली होती.
sushama_Swaraj_
sushama_Swaraj_

बीड : पासपोर्ट व व्हिजा हरवल्याने आमच्यासमोर मोठे संकट होते. मात्र, मित्राच्या माध्यमातून तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला. लंडनला असलेल्या सुषमाजींनी तत्काळ डेन्मार्कमधील भारतीय उच्चायुक्तालयाला निर्देश देऊन आम्हाला त्याच दिवशी पासपोर्ट उपलब्ध करुन दिला, अशी आठवण नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगीतली. 

वयाच्या पंचविसाव्या वर्षी लोकसभा सदस्य म्हणून संसदेत विराजमान झालेल्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे एका कर्तबगार महिला प्रतिनिधीला आपण मुकलो आहोत अशी भावना डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केली. त्यांच्या मदतीला धावलेल्या सुषमा स्वराज  यांच्याबाबत माझ्या मनात कायम आदरच राहणार आहे असेही डॉ. क्षीरसागर म्हणाले. 

डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले," ऑगस्ट २०१४ मध्ये आपण कुटूंबियांसह डेन्मार्कला सुट्यांसाठी गेलो होते. डेन्मार्कची राजधानी कोपन हेगल येथील रेल्वेस्थानकावर चहा पित असताना पत्नी डॉ. दिपा क्षीरसागर यांची पर्स चोरट्यांनी पळविली. या पर्समध्ये पासपोर्ट आणि पैसे होते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. परंतु, मित्र शाम वर्मा यांना फोन करुन मी घटना त्यांच्या कानावर घातली. त्यांनी त्यांचे गुरु ज्ञानानन्द महाराज यांना संपर्क केला. "


"सुषमा स्वराज या ज्ञानानंद महाराज यांच्या भक्त होत्या. ज्ञानानंद महाराज यांनी ही घटना सुषमा स्वराज यांना सांगताच त्यांनी तत्काळ डेन्मार्कमधील भारतीय उच्चायुक्तालयाला संपर्क करुन आम्हाला पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

त्याच दिवशी सायंकाळी आम्हाला पासपोर्ट भेटल्याचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगीतले. विशेष म्हणजे काही वेळांनी त्यांचा फोन आला आणि त्यांनी पासपोर्ट मिल गया ना क्षीरसागरजी? असे विचारुन प्रवासालाही शुभेच्छा दिल्याची आठवण डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगीतली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com