कोरोनाच्या काळात मुंब्रा कळव्यात सुरू असलेले काम प्रतिगाम्यांना बघवले नाही!

पोरी पळवून आणा असे सांगणारे राम कदम आणि सिमेवर लढणाऱ्या सैनिकांची आणि त्यांच्या पत्नीची बदनामी करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावेळी फडणवीस यांची संवेदनशीलता कोठे गेली होती?" असा सवालही अंधारे यांनी केला आहे.
sushma aandhare
sushma aandhare

पुणे : "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा जेवढे संवेदनशील नव्हते तेवढे संवेदनशील विरोधी पक्षनेते झाल्यावर झाले आहेत. म्हणूनच एका विकृत ट्रोलरला मारहाण झाली म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बडतर्फीची मागणी ते करत आहेत. ज्यावेळी नगरचा छिंदम छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुच्छतादर्शक बोलला होता तेव्हा फडणवीस यांची संवेदनशीलता कोठे गेली होती? "असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. 

"जितेंद्र आव्हाड यांना का बडतर्फ करावे? ते कोरोनाच्या काळात हजारो लोकांना जेवण देत आहेत म्हणून की लोकांना आधार देत आहेत म्हणून? असा प्रश्न उपस्थित करत "जितेंद्र आव्हाड कोरोनाच्या काळात मुंब्रा कळवा भागात जे काम करत आहेत. लोकांना सावरत आहेत. हे ज्यांना बघवत नाही त्या प्रतिगामी लोकांनी आव्हाड यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे,"असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप एका इंजिनिअरने केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी,"आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा"अशी मागणी केली आहे. संबधित इंजिनिअर संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा पदाधिकारी असल्याने शिवप्रतिष्ठाननेही आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.  

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आव्हाडांची बाजू घेतली आहे. "आव्हाड यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसावा. आव्हाड यांच्यावर पोस्ट केल्यावर त्याला मारहाण झाली. ही मारहाण नेमकी कोणी केली आहे हे बघितले पाहिजे. कारण या घटनेला राजकीय रंग दिला जातोय. याचाच अर्थ हे सर्व ठरवून सुरू आहे. आजवर आव्हाड यांनी ज्या विचारांच्या विरोधात मांडणी केली, त्याच विचाराचे लोक आव्हाड यांना ठरवून बदनाम करत आहेत. हा एका राजकीय कटाचा भाग असावा असे मला वाटते. आव्हाड यांची बांधिलकी परिवर्तनवादी विचारांशी आहे. त्यांना आजवर सनातनी विचारांच्या ट्रोलर्सनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याबद्दल गलिच्छ लिहिलं गेलं तरी हा माणूस शांत राहिला. विचारांची लढाई लढत राहिला. पण जे त्यांना बदनाम करत होते त्यांनी बदनामी सुरूच ठेवली. त्यादिवशी त्याने आव्हाड यांच्याविरोधात गलिच्छ पोस्ट लिहिली आणि त्याला मारहाण झाली. पण ही मारहाण नेमकी कोणी केली हे पोलिसांनी त्याच्या मुळापर्यंत जावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी."असे प्रा अंधारे म्हणाल्या.

"आज आपण सगळे कोरोनाच्या विरोधात लढण्याची गरज आहे. फडणवीस यांनी याकाळात लोकांना धीर द्यायला हवा. पण तसे न करता ते अशा आणीबाणीच्या काळातही सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. असं राजकारण फक्त तेच करू शकतात. त्यांना आव्हाड यांच्यावर राजकीय कुरघोडी करायला पुढे वेळ मिळणार आहे.आता त्यांनी कोरोनाच्या विरोधात लढावे"असे अंधारे म्हणाल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com