पंढरपूरसाठी सुशीलकुमार शिंदे यांचा आग्रह

पंढरपूरसाठी सुशीलकुमार शिंदे यांचा आग्रह

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच पंढपूरची जागा ही आघाडीमध्ये काॅंग्रेसलाच मिळावी, यासाठी स्वतः काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरल्याची माहिती आहे.

पंढरपूरचे काॅंग्रेस आमदार भारत भालके यांनी जवळपास काॅंग्रेस सोडल्यात जमा आहे. सध्या ते भाजपकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंढरपुरात काॅंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडेच लक्ष लागले आहे.  

पंढरपूर मतदारसंघ हा पारंपारिक काॅंग्रेस विचारसरणीचा आहे. त्यामुळे काॅंग्रेसने येथील जागावर पुन्हा दावा केला आहे.  येथून काॅंग्रेसकडून  निवडणूक लढवण्यासाठी प्रा. शिवाजी काळुंगे, जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे हे इच्छुक आहेत. शिवाजी काळुंगे यांनी दोन महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वीच श्री. काळुंगे यांनी  पाणी परिषदेच्या माध्यमातून काॅंग्रेस पक्षश्रेष्टीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. तर जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनीही काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव घेत आपणही निवणडणुकीच्या शर्यतीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या सहमती नंतरच उमेदवार कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
  
शिंदे आणि प्रा. काळुंगे यांचे अनेक वर्षापासूनचा स्नेह आहे. लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांच्यासाठी प्रा. काळुंगे यांनी मोठी मेहनत घेवून मंगळवेढयातून मताधिक्य देण्याचा प्रा. काळुंगेचा मोठा वाटा  होता. परंतु भाजप लाटेत शिंदेंना पराभव पत्कारावा लागला. तरीही शिंदे यांचा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाळ आजही घट्ट आहे.

काॅंग्रेसचे आमदार भारत भालके अन्य पक्षात जाणार हे गृहीत धरुन काॅंग्रेसने पंढरपूर मतदार संघात जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या तरी प्रा. काळुंगे शिवाय काॅंग्रेसकडे दुसरा सक्षम उमेदवार नसल्याने काळुंगेची उमेदवार जवळपास निश्चित मानली जात आहे. उद्या पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात येथील काॅंग्रेस उमेदवारीचा निर्यण होईल अशी अपेक्षा काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com