भाजपने घेतला राहुल गांधींचा धसका : सुशीलकुमार शिंदे  - sushilkumar shinde on rahul gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने घेतला राहुल गांधींचा धसका : सुशीलकुमार शिंदे 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

सोलापूर : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून गुजरातमधील भाजपने धसका घेतला आहे. येथील निवडणुकीतही कॉंग्रेसला निश्‍चित चांगले यश मिळेल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ते जनवात्सल्यमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

सोलापूर : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून गुजरातमधील भाजपने धसका घेतला आहे. येथील निवडणुकीतही कॉंग्रेसला निश्‍चित चांगले यश मिळेल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ते जनवात्सल्यमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. शिंदे म्हणाले,""नोटा बंदी व जीएसटीचा फटका भाजपला बसणार आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी जीएसटीमध्ये करण्यात आलेली कपात हे भाजप "बॅकफूटवर' गेल्याचे उदाहरण आहे. या ठिकाणी राहूल गांधी यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार आहे.'' 

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला निश्‍चित चांगले यश मिळेल असा दावा श्री. शिंदे यांनी केला. ते म्हणाले,""भाजप सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका हिमाचल प्रदेशातील जनतेला बसला आहे. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसेल. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद पाहता, गुजरात निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांना व्यूहरचना बदलावी लागली.'' 

'सरकारनामा' मोबाईल अॅप
अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा
iPhone वर 'सरकारनामा' वाचा

अँड्रॉईड अॅपची लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama&hl=en

iOS अॅपची लिंक:
https://itunes.apple.com/gb/app/sarkarnama/id1282880016?mt=8 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख