sushilkumar shinde criticise narendra modi about solapuri jacket | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पंतप्रधान मोदींनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडली : सुशीलकुमार शिंदे  

विजयकुमार सोनवणे  
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मोदी सरकार सत्तेवर आल्यावर तीन वर्षे थांबा असे मी म्हटले होते.

सोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले. चुकीची माहिती देऊन मोदी सरकारकडून सातत्याने बनवेगिरी केली जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

प्रदेश कांग्रेस समितीच्या वतीने आयोजिलेल्या दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. निरीक्षक सोनम पटेल, आमदार प्रणिती शिंदे, रामहरी रूपनवर, भारत भालके व सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते. 

श्री. शिंदे म्हणाले, मोदी आल्यावर देशाचा विकास होईल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात ते झाले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर तीन वर्षे थांबा असे मी म्हटले होते. तीन वर्षानंतर या सरकारचे खरे स्वरूप दिसून आले आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या वेळीही अशाच पद्धतीने पेट्रोलपंपांवर प्रसिद्धी केली जात होती. आताही त्याच पद्धतीचे फोटो लावले जात आहेत, मात्र पेट्रोल घ्यायला येणारे लोकच आता त्या पोस्टरला काळे फासत आहेत. आज त्यांच्या डोक्यात सत्ता घुसली आहे, त्यामुळे देशात हुकुमशाही असावी असे त्यांना वाटत आहे.

शिर्डीत बोलताना मोदी म्हणाले की मी घातलेले जॅकेट सोलापुरात तयार झाले आहे. देशाचे गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी या जॅकेटचा वापर मिलिट्रीसाठी का केला नाही. त्याचवेळी या कपड्याचा वापर निश्चित केला जाईल, असे सांगितले. मात्र आजपर्यंत एकाही पैशाची ऑर्डर मिळालेली नाही. अशा पद्धतीनेच बनवेगिरी करण्यात मोदी सरकार आघाडीवर आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख