Sushilkumar Criticises Khattar | Sarkarnama

खट्टर अननुभवी मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

या घटनेचे पडसाद हरियाणासह पंजाब, राजस्थान आणि दिल्लीमध्ये उमटले. हरियानामध्ये परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात तेथील सरकारला यश आले आहे - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : 'डेरा सच्चा सौदा' प्रकरण हाताळण्यात हरियाणा सरकाराल
अपयश आले आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे अनअनुभवी मुख्यमंत्री आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज केली.

काँग्रेस भवनात श्री. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''या घटनेचे पडसाद हरियाणासह पंजाब, राजस्थान आणि दिल्लीमध्ये उमटले. हरियानामध्ये परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात तेथील सरकारला यश आले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांच्या अनअनुभवाचा फटका स्थानिक राज्यकर्त्यांना तसेच दिल्लीतल्या राज्यकर्त्यांनाही बसणार आहे.''

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात छेडले असता
श्री. शिंदे म्हणाले, ''मी काल त्यांच्याशी बोललो आहे. ते उद्या (रविवारी)
सोलापुरात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख