सुशीला मोराळेंना बीडमध्ये हवी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी!

पुरोगामी विचारांच्या नेत्या अशी मोराळेंची ओळख आहे.
सुशीला मोराळेंना बीडमध्ये हवी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी!

पुणे : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेली बीड लोकसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सुशील मोराळे या आगामी निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यांना लोकतांत्रिक जनता दलाच्या कोट्यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची उमेदवारी हवी आहे. 

पुरोगामी विचारांच्या नेत्या अशी मोराळेंची ओळख आहे. खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या लोकतांत्रिक जनता दलाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या पक्षाच्या त्या राष्ट्रीय महासचिव आहेत. देशपातळीवर पक्षबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या मूळ बीडच्या असल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीतही रस आहे.

महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महाआघाडीची बांधणी सुरु आहे. शरद यादव यांच्या धोरणाप्रमाणे महाराष्ट्रातही त्यांचा पक्ष कॉंग्रेस आघाडीत राहणार आहे. या संभाव्य आघाडीतील घटक पक्षांची बैठक नुकतीच झाली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह लोकतांत्रिक जनता दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बीडच्या जागेबाबत चर्चा आल्यावर तिथे सुशीला मोराळेंचा दावा सांगण्यात आला.

यासंबंधी मोराळे म्हणाल्या,"भाजपचा पराभव व्हावा, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. बीड लोकसभा मतदारसंघात अपवाद वगळता भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. या जागेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी नेहमीच पराभूत झाली आहे. ही जागा लोकतांत्रिक जनता दलाला मिळाली तर नक्कीच विजयी होऊ. आम्हाला जर उमेदवारी दिली नाही तरी समविचारी आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करू.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com