जिल्हा परिषदेत विखे पाटील यांची हुकुमशाही :सुषमा दराडे

जिल्हा परिषदेत अध्यक्षा विखे पाटील यांची हुकुमशाही आहे. लोणीला मुजरा करणारेच अधिकारी त्यांना हवे असतात.
sushama-darade
sushama-darade

नगर  : अकोले तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार झाला असून, याप्रकरणी गटविकास अधिकारी व संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचाच या प्रकरणाला वरदहस्त असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.


दराडे म्हणाल्या, ``अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, केळी, तिरडे, आबिटखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंयातींमध्ये गैरवरहार झाला. संबंधित ग्रामसेवकांनी मोठ्या रकमा कशा काढल्या, याबाबत आपण वारंवर गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र त्याची माहिती मिळाली नाही. अखेर आपण जिल्हा परिषदेच्या सभेत याबाबत आवाज उठविला. परंतु अध्यक्षांनी बोलून दिले नाही." 


गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, हाच सवाल मी विचारीत असताना माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात अशाच अनेक महिला सदस्यांना सभेमध्ये बोलू दिले जात नाही. बहुतेकांची विखे यांच्या विरोधात नाराजी आहे, मात्र त्यांना बोलण्याचे धाडस होत नाही. मी बोलले, तर माझेऐकून  घेतले जात नाही. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चाैकशी होऊन गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आपण केली आहे. यापूर्वी एका शिक्षकाच्या बदलीप्रकरणी कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. येथे मात्र गैरव्यवहार दिसत असतानाही गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित केले जात नाही. याबाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणास बसू,``असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


विखेंची हुकुमशाही चालतेया वेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे म्हणाले, ``जिल्हा परिषदेत अध्यक्षा विखे पाटील यांची हुकुमशाही आहे. लोणीला मुजरा करणारेच अधिकारी त्यांना हवे असतात. विखे कुटुंबिय असे वागत असतील, तर हे जिल्ह्यातील जनता खपवून घेणार नाही. अध्यक्ष दादागिरीने सभागृह चालवित आहेत. जिल्हा परिषदेचा निधी ठराविक सदस्यांच्या गटातच दिला जातो. अकोले तालुक्यात अनेक कामे प्रलंबित असताना निधी दिला जात नाही,`` असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com