एकनाथ खडसे, तावडे सर्वेक्षणात मागे पडले : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

भारतीय जनता पक्षाने केलेल्या निवडणूक सर्व्हेक्षणात एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाशिकचे बाळासाहेब सानप मागे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
 एकनाथ खडसे, तावडे सर्वेक्षणात मागे पडले : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

नाशिक  : भारतीय जनता पक्षाने केलेल्या निवडणूक सर्व्हेक्षणात एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे,  चंद्रशेखर बावनकुळे आणि नाशिकचे बाळासाहेब सानप मागे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.   

मंत्री गिरीश महाजन नाशिक शहरात भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर 'डॅमेज कंट्रोल'साठी येथे दाखल झाले. त्यांनी बंडखोरांना माफी नाही, पश्‍चात्ताप करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड दम वजा इशाराही दिला. महाजन म्हणाले की, कनाथ खडसे यांच्या कन्येला उमेदवारी दिल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. राज्यात बंडखोरी झाली असली तरी अर्ज माघारीपर्यंत सर्व ठीक होईल. भाजपमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी दिली जाते, पैसे घेऊन नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
  
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. सर्वाधिक बंडाचा फटका भाजपला बसला असून, नाशिक शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. सर्वाधिक परिणाम पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट झाल्यानंतर घडले. अनेक नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शविल्याने पक्षात बेदिली निर्माण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी तातडीने नाशिक गाठत पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

आमदार सानप यांना उमेदवारी का नाकारली, याबाबत त्यांनी नगरसेवकांसमोर स्पष्टीकरण दिले. सानप यांना पक्षाने मोठी पदे दिली. कार्यकर्त्यांनी संयम राखावा, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे, राज्यात भाजपला अनुकूल वातावरण असल्याने चुका करू नयेत. विरोधी पक्षाचे 40 ते 50 आमदार निवडून येतील अशी स्थिती असल्याने कोणीही पक्षाविरोधात काम करू नये, पक्षात चुकीला माफी नाही. लहान म्हणून उद्या कोणी माफ करणार नाही. त्यामुळे पश्‍चात्तापाची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबीही त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com