Sureshdada Jain enjoys Bullet ride | Sarkarnama

सुरेशदादा जैन प्रचारासाठी झाले 'बुलेटस्वार' 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनाही दुचाकीवाहनावर स्वार होण्याचा मोह आवरला नाही. प्रचारादरम्यान ते चक्क बुलेटवर स्वार झाले. 

जळगाव  :नेते आणि वाहन यांचे नेहमीच सख्य आहे. त्यांना वाहनाचे आकर्षण असतेच माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनाही दुचाकीवाहनावर स्वार होण्याचा मोह आवरला नाही. प्रचारादरम्यान ते चक्क बुलेटवर स्वार झाले. 

जळगाव महापालिकेच्या निवडणूकांचा प्रचार जोरात सुरू आहे. शिवसेनेने आपल्या उमेदवारांसाठी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन प्रचारासाठी प्रत्येक उमेदवारांच्या प्रभागात जावून मतदारांच्या भेटी घेत आहेत. जळगावात आज ते ओकांरेश्‍वर मंदिर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचार करीत होते.

 याच प्रभागातील शिवसेनेचे उमदेवार नगरसेवक बंटी उर्फ अनंत जोशी यांची बुलेट चालविण्याचा कार्यकर्त्यांनी जैन यांना आग्रह केला आणि जैन यांनाही आपला वाहनांच्या आवडीचा मोह आवरला नाही, आणि ते चक्क बुलेटवर स्वार झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला, यावेळी सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख