आजचा वाढदिवस : सुरेश प्रभू - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री - suresh prabhu birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : सुरेश प्रभू - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे शांत, संयमी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवेश राहिला आहे. प्रभू हे कोकणातील नेते म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील दादर परिसरात झाले. सारस्वत बॅंकेच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते प्रथम शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी ते केंद्रातील वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले. पुढे त्यांनी शिवसेना सोडली. 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येताच त्यांना केंद्रात रेल्वे मंत्री करण्यात आले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे शांत, संयमी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवेश राहिला आहे. प्रभू हे कोकणातील नेते म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील दादर परिसरात झाले. सारस्वत बॅंकेच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते प्रथम शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी ते केंद्रातील वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले. पुढे त्यांनी शिवसेना सोडली. 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येताच त्यांना केंद्रात रेल्वे मंत्री करण्यात आले. प्रभू यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नदीजोड प्रकल्पासाठीही त्यांनी योगदान दिले. आज ते मोदींच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्री आहेत. प्रभू हे व्यवसायाने चार्टड अकॉऊन्टट आहेत. प्रभू हे अजातशत्रू नेते म्हणून ओळखले जातात.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख