suresh halwankar about devendar fadavnis | Sarkarnama

मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले नाही, मात्र फडणवीसांनी पुढाकार घेतलाय! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील काही मंडळी राजकारण करीत आहेत. आरक्षणाचा पुळका असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील शिक्षण सम्राटांनी त्यांच्या सहकारी संस्थामध्ये तातडीने मराठा विद्यार्थ्यांना 16 टक्के आरक्षण द्यावे, असे भाजपचे इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे केले.

सांगली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील काही मंडळी राजकारण करीत आहेत. आरक्षणाचा पुळका असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील शिक्षण सम्राटांनी त्यांच्या सहकारी संस्थामध्ये तातडीने मराठा विद्यार्थ्यांना 16 टक्के आरक्षण द्यावे, असे भाजपचे इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे केले.

महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज विश्रामबाग गणपती मंदिर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

आमदार हाळवणकर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. मराठा आरक्षण आंदोलनाचा संदर्भ घेत ते म्हणाले,"मराठा आरक्षण देण्यासाठी भाजप कटीबद्ध आहे. परंतू कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील काही मंडळी त्यावरून राजकारण करीत आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे त्याचे भांडवल केले जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मराठा आरक्षणाचा एवढाच पुळका असेल तर आज त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शिक्षण संस्थामध्ये तातडीने ते आरक्षण लागू करु शकतात. तसेच ते तिथल्या नोकऱ्यांमध्येही द्यावे. परंतू ते देणार नाहीत. देशातील विविध राज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या परप्रांतिय विद्यार्थ्यांकडून मिळणारे डोनेशन त्यांना हवे आहे.'' 

आमदार हाळवणकर म्हणाले, "मराठा समाज संयमी आहे. राज्यात शांततेने मोर्चे काढले. जगभरात त्याची दखल घेतली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस आणले आहेत. आरक्षण जरूर दिले जाईल. गेल्या 70 वर्षात कॉंग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांना आरक्षण देता आले नाही. परंतू भाजपचे ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.''  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख