धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंवरील आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : सुरेश धस

परळी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोर्चा काढला होता. यानंतर त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विविध आरोप केले होते. त्याला भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Munde_Dhas
Munde_Dhas

बीड : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचे आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहित झाले आहे.न मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारांनी 'वैद्यनाथ’वर बोलू नये असा टोला भाजप आमदार सुरेश सुरेश धस यांनी श्री. मुंडे यांच्यावर लगावला आहे. 

मोर्चा म्हणजे एक नाटक असून राष्ट्रवादी पक्ष रसातळाला गेल्याने त्यांचे नेते बिथरल्याची टिकाही धसांनी केली.

परळी मतदार संघातील शेतकऱ्यांचा पिक विमा, वैद्यनाथ कारखान्याकडील शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे, शहराचा पाणी प्रश्न आदी विविध प्रश्नांवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आणि वैद्यनाथ कारखान्यावर विविध आरोप केले होते. त्याला आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

धनंजय मुंडेंचे आरोप निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले असून या निमित्ताने त्यांचा राजकीय द्वेष उफाळून आल्याचे दिसते. एवढे मोठे संविधानिक पद असतानाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात ते सभागृहात एकही आरोप सिद्ध करू शकले नसल्याने ते असा डाव खेळत असल्याचेही धस म्हणाले.

 जगमित्र कारखान्याच्या नावाखाली शेतक-यांच्या जमिनी लुबाडल्या, खोटे चेक दिले, पैसे लाटले, याप्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे. तोडपाणीचे राजकारण करता मग 'त्या' शेतक-यांचे पैसे का देत नाहीत? असा सवालही सुरेश धस यांनी केला आहे. अगोदर लुबाडलेल्या जमिनीचा हिशोब द्या मगच वैद्यनाथ कारखान्याबद्दल बोला, असे आव्हानही धसांनी दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com