suresh dhas on ramesh aadaskar | Sarkarnama

आम्ही विधिमंडळात सांगू याच 'हाबाड्याने' सोळंकेला पाडले : सुरेश धस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षण भेटले. त्यामुळे समाजातील एमबीबीएसला प्रवेश भेटणाऱ्यांची संख्या वाढली आणि लाखो रुपये लागणारे शुल्क कमी झाल्याचेही आमदार सुरेश धस म्हणाले. 

माजलगाव (बीड): दिवंगत बाबुराव आडसकर विजयी झाले तेव्हा 'हाबाडा' कोण हे पहायला विधिमंडळात गर्दी जमायची. आता प्रकाश सोळंके यांना पाडणार हाबाडा हा आहे हे आम्ही विधिमंडळात दाखवू असे आमदार सुरेश धस म्हणाले.
 
तसे रमेश आडसकर हजारो लोकांत उभे असले तरी सहा फूट उंच असल्याने ठळक दिसतात असे म्हणताच टाळ्या पडल्या. 

देशाचा स्वाभिमान असलेले काश्मीरचे 370 कलम, शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन, जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा, दुष्काळ भरपाई असे अनेक कामे राज्य आणि केंद्र सरकारने केली आहेत. मराठा आरक्षणासाठी 40 वर्षे झुलवत ठेवणारी मंडळी आता फुकटचा पुळका दाखवत आहेत.  

बाबुराव आडसकर विजयी झाल्यानंतर विधिमंडळात त्यांना पहायला गर्दी व्हायची. आता रमेश आडसकर देखील तीन वेळा आमदार व मंत्री राहिलेल्या प्रकाश सोळंके यांचा पराभव करणार आहेत. त्यामुळे हा हाबाडा कोण हे पाहायला गर्दी होणार आहे. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी रमेश आडसकर यांना विजयी करा असे आवाहन देखील आमदार सुरेश धस यांनी केले. भाजप उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ श्री. धस यांनी दिंदृड, कुप्पा, किट्टीआडगाव या ठिकाणी सभा घेतल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख