राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलेले 'पुणेरी पगडी'वाले सुरेश धस व्हायरल!

राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलेले 'पुणेरी पगडी'वाले सुरेश धस व्हायरल!

पुणे: येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात "पुणेरी पगडी'ला हद्दपार करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यभर उलटसुलट चर्चा सरु असताना उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाचा निकाल आला आहे. विधान परिषदेच्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस विजयी झाले आहेत. धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्याने "पुणेरी पगडी' घातलेली खास छबी बनवून ती व्हायरल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर पगडीवरुन राजकारण गरम झाले आहे. जातीय संदर्भाने पगडी, पागोट्यांची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या चर्चा झडत असतानाच विधान परिषद निवडणुकीत सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना हा मोठा सेटबॅक आहे. तसेच 100 मते जास्त असतानाही राष्ट्रवादीवर नामुष्की ओढवली. त्यामुळे हा विजय साजरा करत असताना भाजप समर्थकांनी धसांचा पुणेरी पगडीवाला फोटो व्हायरल करुन राष्ट्रवादीला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com