फोडाफोडीत माहीर असलेले सुरेश धस रिंगणात! विधानपरिषदेची उमेदवारी घेऊनच भाजप प्रवेश

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत भाजपला थेट मदत करणाऱ्या सुरेश धस यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर कडाडून टीका केली होती. निलंबीत केल्यानंतर सुरेश धस भाजपच्या जवळ होते. आज त्यांनी अधिकृत प्रवेश केला.दरम्यान, लातूर-उस्मानाबाद-बीड मतदार संघातून सुरेश धस यांना भाजपकडून उमेदवारी भेटणार, हेवृत्त सर्वात आधी(ता. २१ मार्च) ‘सरकारनामा’नेप्रसिद्ध केलेहोते.
फोडाफोडीत माहीर असलेले सुरेश धस रिंगणात! विधानपरिषदेची उमेदवारी घेऊनच भाजप प्रवेश

बीड : मागच्या वर्षभरापासून जिल्यात राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या सुरेश धसांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून गुरुवारी त्यांच्या डोक्यावर लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजप उमेदवारीचा मुकूट चढविला जाणार आहे. त्यामुळे इतर चर्चांनाही आता पुर्णविराम भेटला आहे. 

राजकीय डावपेचात माहिर असलेल्या सुरेश धसांनी जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात अनेक धमाके केले. गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेली जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या  गळ्यात घातली. एवढ्यावरच न थांबता ‘राष्ट्रवादीत आता मागच्या दारावाटे’ (विधान परिषद) येणाऱ्यांची चालती असल्याची टिका करुन त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा रोष ओढावून घेतला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

राष्ट्रवादीने निलंबीत केल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून त्यांची नेहमीच हेटाळणी होत होती. कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे त्यांचे फोटो व्हायरल होत होते. तर, अगदी पंकजा मुंडेंनीही त्यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे धस भाजपमध्ये जाणार हे निश्चित मानले जात असले तरी त्यांचा अधिकृत प्रवेश होत नव्हता.

त्यांना स्थानिक स्वराज्य मतदार संघाची उमेदवारी देत भाजपने जिल्हा परिषदेला केलेल्या उपकाराची परतफेड केली आहे. पंकजा मुंडे व संभाजी पाटील निलंगेकर या दोन मातब्बर मंत्र्यांचे पाठबळ हे बलस्थान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच, फोडाफोडीच्या राजकारणाचा त्यांचा स्वत:चाच हातखंडा आहे. दरम्यान, गुरुवारी दोन्ही मंत्र्यांसह तिनही जिल्ह्यांतील भाजपच्या आमदारांच्या उपस्थितीत सुरेश धस उस्मानाबाद येथे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com