सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिटू मिटू बोलत आहे... : धस यांचा वेगळाच शोध

 सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिटू मिटू बोलत आहे... : धस यांचा वेगळाच शोध

बीड : एका राजाला पशु - पक्षांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण, शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिटू मिटू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचेच खरे वाटायला लागले आहे. त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावे लागले असून जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातले भांडणही त्यामुळेच लागल्याचा टोला लगावत आमदार सुरेश धस यांनी लोकसभेनंतर हा पोपट नसेल असा विश्वासही व्यक्त केला. मात्र, आता हा पोपट कोण असा सवाल उपस्थित होत आहे. 

कडा येथे भाजपच्या सभेत श्री. धस यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सर्वांनाच पोट धरुन हसायला लावले. भाजप सरकार शेतकरी विरोधी असा अपप्रचार केला जातो. मग, काय आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना चांदीचे ताट आणि आता जर्मनचे आहे का, असा सवाल करत भाजप सरकारने पारदर्शक कारभारासाठी योजना ऑनलाईन केल्याने टग्यांचे (दलालांचे) नुकसान झाले. त्यांच्याकडूनच तसा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला. 

देवेंद्र फडणवीस यांची जात काढून प्रतिकात्मक वर्षश्रद्धा घातले. पण, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे या बाबीचाही समाजाने विचार करावा. आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे, अजित पवार आणि आपण स्वत: असे तिघेच मंत्रीमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर बोलत होतो. त्यामुळे राष्ट्रवादीने आरक्षणावर बोलू नये असेही सुरेश धस म्हणाले. 

थ्री डी (सुरेश धस, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर) एकत्र आल्याने पुढे काय, अशी चर्चा होत असली तरी पुढचे पुढे बघू असे धस म्हणाले. दरम्यान, भाषणाच्या शेवटी सुरेश धस यांनी राजा आणि पोपटाची गोष्ट सांगून हास्याचे आणखीनच फवारे उडविले. त्यांच्या भाषणाचा संदर्भ सध्याची राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांबाबत होता. पण, लोकसभेनंतर हा पोपट नसेल असेही धस म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com