सुरेश धस यांच्याकडून चारा छावण्यांसाठी पुढाकार...

दुष्काळी उपाय योजनांत अधिकाऱ्यांनी घातलेली नियमांची आडकाठी कशी दुर करायची यावर सुरेश धस यांनी यापूर्वीही मार्ग शोधलेले आहेत. पावसाळा सुरु झाला तरी बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता आहे. त्यामुळे नव्याने टॅंकर आणि चारा छावण्या सुरु व्हाव्यात यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला.
सुरेश धस यांच्याकडून चारा छावण्यांसाठी पुढाकार...

बीड : पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना लोटला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाच्या झळा कायम आहेत. यावर मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केल्याने नव्याने पाण्याचे टॅंकर आणि छावण्या सुरु होणार आहेत. त्यामुळे दुष्काळावर उपाय आणि सुरेश धस हे समीकरणच तयार झाले असेच म्हणावे लागेल. 

दुष्काळ बीड जिल्ह्याच्या कायम पाचवीला पुजलेला आहे. दुष्काळावर उपाय योजना करण्यासाठी सरकार धोरण आखते पण सरकारी अधिकारी त्यात नियमांची खुटी मारतात. मात्र, जटील नियमांची दुरुस्ती करण्याचे जालिम उपाय कायम सुरेश धस यांनी शोधलेले आहेत. दुष्काळी जिल्ह्यात आष्टी - पाटोदा - शिरुर हे तीन तालुके इतर तालुक्‍यांच्या प्रमाणात अधिक दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे शेतीपिक या भागात कमीच असते. मात्र, या भागातील शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा उपलब्ध करुन देण्याचा धसांचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन आष्टी तालुक्‍यात आहे. 

विशेष म्हणजे, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असा कलंक लागलेल्या जिल्ह्यात सर्वात कमी शेतकरी आत्महत्याही आष्टी तालुक्‍यातच आहेत. एकदा राहयोच्या कामांच्या मंजुरीत सचिवांनी अशीच मेख मारली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी मंत्री असतानाही मंत्रालयातून उडी मारण्याचा इशारा देऊन त्यांनी हा जटील नियम दुरुस्त करुन घेतला. मागच्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. त्यावर उपाय योजना म्हणून सरकारने टॅंकर व छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण, टॅंकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे ही जटील प्रक्रीया ठरु पाहत होती. मात्र, लवकर टॅंकर मंजूरीच्या दृष्टीने त्यांनी हे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना मिळावेत यासाठीही यशस्वी पाठपुरावा केला. 

टॅंकरचालकांना देण्यात येणारे भाडे परवडणारे नव्हते. भाडे वाढविण्यासाठीही त्यांनी नियम बदलून आणला. जिल्ह्यातील नऊशेवर टॅंकरचालकांना त्याचा फायदा झाला. मागच्या वर्षी छावण्या सुरु केल्या खऱ्या पण चालकांना देण्यात येणारा मोबदला कमी होता. ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या सुरेश धस यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. त्यांच्या लक्षात आल्यानंतर मोबदल्यात वाढ झाली. यामुळे छावणीचालक आणि परिणामी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. दरम्यान, पावसाळा सुरु झाल्याने टॅंकर व छावण्या बंद झाल्या. मात्र, पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना लोटत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे नव्याने टॅंकर आणि छावण्या सुरु करण्यासाठी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आता नव्याने छावण्या सुरु होणार आहेत. एकूणच दुष्काळावरील उपाय योजना आणि सुरेश धस हे समीकरणच झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com